
लोहा| अंत्यत गरिबीतून शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आणि येत्या काळात डीवायएसपी म्हणून सेवेत रुजू होणारे बेरळी येथील भूमिपुत्र अरविंद रायबोले यांच्या पुढाकाराने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संबोधी बुद्ध विहार येथे मोफत अभ्यासिका सुरू केली आहे.


जिल्हा परिषद यवतमाळ येथे अरविंद रायबोले हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतेच रुजू झाले आहेत लबकरच ते डीवायएसपी म्हणून रुजू होणार आहेत त्यांच्या पुढाकाराने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तरुण पिढी पर्यंत पोहचविण्यासाठी ग्रंथालय व अभ्यासिका सुरू करण्यात आली यासाठी गावकऱ्यांचे सहकार्य मिळाले उद्घाटन डेप्युटी सीईओ अरविंद रायबोले यांच्या हस्ते करण्यात आले.


अभ्यासिकेत सरळसेवा ते एमपीएससी यूपीएससी परीक्षांचे संदर्भ पुस्तके या ग्रंथालयात ठेवण्यात आले आहेत. ग्रंथालयास प्राथमिक शाळेतील शिक्षक आर जी वाघमारे यांनी पुस्तके भेट दिली. ‘ बुद्ध विहार हे धम्मा सोबतच शिक्षणाचे केंद्र व्हावे व येथून अनेक जण उच्च पदावर जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कृतीत उतरवावे. इतर ठिकाणीही विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अभ्यासिका सुरू कराव्यात असे विचार या प्रसंगी अरविंद रायबोले यांनी मांडले.


प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ मिलिंद धनसडे, जयंती मंडळाचे अध्यक्ष देवानंद रायबोले, उपाध्यक्ष नामदेव बुद्धे, सरपंच व्यंकटेश नाईक, मंगल सोनकांबळे, विशाल महाबळे, शंकर गायकवाड, गोविंद बुद्धे, ज्ञानोबा रायबोले, कपिल रायबोले, जळबा कांबळे, कृष्णा कांबळे , राम कांबळे ,उत्तम गायकवाड , माधव डोंगरे, आनंदा डोंगरे, भास्कर कदम, धोंडिबा रायबोले आदी उपस्थित होते. या अभ्यासिकेचा विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे असे सांगण्यात आले.
