
नांदेड| विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा नांदेड महानगर चिटणीस क्षितीज जाधव यांच्या वतीने दि.27 एप्रिल रोजी मी होणार सुपरस्टार, इंडियन आयडल व सुर नवा ध्यास नवा कलर्स मराठी फेम संतोष जोंधळे नाशिक व त्यांच्या संचाचा बुध्दभिम गितांचा सांस्कृतिक कार्यक्रम तक्षशिला बुध्दविहार भगिरथनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.


या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. भाजपा संघटनमंत्री संजय कौडगे यांची मुख्य मार्गदर्शक म्हणून तर मिलिंद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष बी.बी.पवार, विमलताई किर्तने असून, सुत्रसंचालन लातूर येथील सुशिल सूर्यवंशी हे करणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल गोधने, किरण फुले, धम्मा येडके, भिमरत्न राजभोज, महेश जोंधळे, अमर सोनसळे, राजू कपोळे, पप्पू कोल्हे, पप्पू कांबळे, पवन जाधव, विकी चव्हाण, आकाश लेवडे, गौरव पाटील जाधव, राजू साठे, सचिन कपाळे, कपिल तिमेवर आदी परिश्रम घेत असून, झुकेगा नही साला-डॅशिंग जयभिम वाला या प्रसिध्द गाण्याचे गायक संतोष जोंधळे यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा नांदेड महानगर चिटणीस क्षितीज जाधव यांनी केले आहे.

