
लोहा। युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सामाजिक, शिक्षण ,साहित्य,राजकीय पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा निर्माण करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना डॉ.बी.आर.आंबेडकर फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. संस्थेचे अध्यक्ष बापूराव गजभारे यांनी प्रज्ञावंत विद्यार्थी पुरस्कार देण्याचे मागील वर्षी घोषित केले होते यंदा पहिलाच मनोज गजभारे प्रज्ञावंत विद्यार्थी पुरस्काराने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण घेणाऱ्या एमएस्सी बायो टेक्नॉलॉजी मध्ये पदव्युत्तर झालेल्या व पीएचडी करणाऱ्या लोह्याच्या सिद्धांत दिलीप महाबळे याना सन्मानित करण्यात येणार आहे.

