
नवीन नांदेड। मनपा आयुक्त नांदेड यांनी पाणीपट्टी दरात केलेली 50 टक्के केलेली वाढ रद्द करण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. वैजयंती गायकवाड यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाणे,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांचा कडे निवेदनाद्वारे केली आहे.


मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाणे यांना दिलेल्या निवेदनात,शासनाने महापालिका निवडणुका निर्धारित वेळेत घेतल्या नाहीत त्यामुळे सर्वत्र प्रशासक राज अवतरले आहे, नांदेड मनपा आयुक्तांनी दि. 24 एप्रिल 2023 च्या प्रशासकीय आदेशान्वये सर्व श्रेणीतील ग्राहकांच्या पाणी पुरवठा करात सरसकट 50 % वाढ केली आहे. आता सामान्य ग्राहकांना 2657/- रुपया वरुन 4300/- रु. वार्षिक पाणी पुरवठा कर भरावा लागणार आहे. ही कर वाढ सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी नाही.


म्हणुन सदरची कर वाढ मनपा निवडणूक होई पर्यंत स्थगित करण्यात यावी अशी विनंती माजी नगरसेविका सौ वैजयंती गायकवाड यांनी एका निवेदनाद्वारे आयुक्तांना केली आहे, सदरील निवेदनाचा प्रति महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण पत्र देऊन प्रशासनाने केलेली कर वाढ स्थगित करण्याचे आयुक्तांना निर्देश घावेत अशी विनंती केली आहे. सदरील निवेदन अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांना नगरसेविका प्रतिनिधी भि. ना. गायकवाड यांनी दिले.

