Tuesday, June 6, 2023
Home नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन -NNL

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड| जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्यावतीने रविवार 30 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय तसेच कौटुंबिक न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व संबंधित पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एन.व्ही. न्हावकर व न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती डी.एम.जज यांनी केले आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भूसंपादन, धनादेश अनादरीत झाल्याबाबत प्रकरणे, तसेच कौटुंबिक न्यायालयातील तडजोड होण्यायोग्य प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण मंच, सहकार न्यायालय व कामगार न्यायालयातील प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे या लोक न्यायालयात ठेवण्यात येणार आहेत.

याशिवाय या लोकअदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तसेच पाणी बिल थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये झालेल्या निवाड्याविरुध्द अपील नाही. प्रलंबित प्रकरणात भरलेली कोर्ट फीची रक्कम परत मिळते. नातेसंबंधात कटुता निर्माण होत नाही. अशाप्रकारे लोकन्यायालयाच्या माध्यमातून सुलभ, जलद व मोफत न्याय मिळतो.

तरी या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हयातील सर्व विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. पक्षकारांनी येताना आपले अधिकृत ओळखपत्र घेवून यावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य रोडवर प्रतिबंधात्मक आदेश
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे मान्यवरांचे हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी 29 एप्रिल 2023 रोजी (28 एप्रिलच्या मध्यरात्री पासून) ते सोमवार 1 मे 2023 रोजी मध्यरात्रीपर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध केले आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!