
नवीन नांदेड। सिडको परिसरातील अनेक भागात अवकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे तूबलेल्लेया नाल्यामुळे घरात दुर्गंधी युक्त पाणी गेल्याने हाहाकार ऊडला असुन भाजपा मंडळ सिडकोचे अध्यक्ष वैजनाथ देशमुख यांनी केलेल्या पाहणी नंतर तात्काळ तक्रारीची दखल घेत सहाय्यक आयुक्त डॉ रईसोधदीन व कार्यालय अधिक्षक विलास गजभारे यांनी स्वच्छता विभागाला नाले साफसफाई तात्काळ करण्याचा सुचना दिल्या, २७ एप्रिल रोजी दुपारी परिसरातील अनेक भागात मुसळधार व गाराचा पाऊस झाला यामुळे आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेते भाजीपाला सोडून मुसळधार पाऊसा मुळे सुटका करून घेतली.


सिडको हडको परिसरातील अनेक भागात तिसरा दिवसी दुपार नंतर मेघगर्जना सह मुसळधार पावसामुळे नागरीक दक्ष होते, पंरतु २७ एप्रिल रोजी दुपारी तीन ते चारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे गारा पडल्या, गुरूवार आठवडी बाजार असल्याने बाजारात ग्रामीण भागातून मोठया प्रमाणात भाजीपाला विक्रेते आले होते, भाजीपाला विक्रेते यांनी आणलेले भाजीपाला पावसामुळे इतरत्र विखुरलेले अवस्थेत फेकला गेले.


तर मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील दुतर्फा नाल्या साफसफाई न केल्याने सखल भागात रस्त्यावरील कचरा व दुरंगधी युक्त पाणी अनेक भागात अनेकांचा निवासस्थानी शिरल्याने नागरीकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत भाजपा मंडळ सिडको अध्यक्ष वैजनाथ देशमुख यांनी मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय सिडकोचे सहाय्यक आयुक्त डॉ र ईसौधदीन व कार्यालय अधिक्षक विलास गजभारे यांनी एन. डी. ४१ परिसरातील भागाची पाहणी केली.


तुंबलेले नाला जे. सी. बी व कर्मचारी यांच्या साहाय्याने तात्काळ साफसफाई करण्यासाठी स्वच्छता विभाग यांना सुचना दिल्या. अंतर्गत रस्तावर पाईप लाईन टाकून पाण्याचा निचरा करण्यात येणार असल्याचे सांगितले, पावसाळ्या पुर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मात्र दुर्गंधी युक्त पाणी रस्त्यावर आल्याने नाले साफसफाई केवळ कागदोपत्री झाल्याची चर्चा ऐकवयावस मिळाली. आठवडी बाजार परिसरातील अनेक भाजीपाला विक्रेते यांना मात्र या मुसळधार पावसामुळे फटका बसला आहे.
