
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। मौजे नायगाव वाडी येथे दिनांक 22 एप्रिल 2023 पासून अखंड हरिनाम सप्ताह व लक्ष्मण शक्ती सोहळा समस्त गावकऱ्यांच्या वतीने आयोजन केले असून या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा सातवा दिवस आहे. तर लक्ष्मण शक्ती सोहळा दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत आयोजित करण्यात आली होती.


दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समस्त गावकऱ्यांच्या वतीने आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व लक्ष्मण शक्ती सोहळा या धार्मिक कार्यक्रमाच्या प्रसंगी दिनांक 22 एप्रिल पासून विविध नामांकित कीर्तनकाराचे कीर्तन रुपी सेवा भाविक भक्तांना मिळाली असून पहिल्या दिवशी निरंजन महाराज रुईकर, त्यानंतर दासू महाराज रातोळीकर, शिवाजी महाराज जळकोटकर, व्यंकट महाराज एकलारकर, माधव महाराज देवकते घागरदरा, गंगाधर महाराज वसुरकर, ज्ञानेश्वरीताई अनुपवाडीकर, व दिनांक 29 एप्रिल रोजी काल्याचे किर्तन वासुदेव महाराज कोलंबीकर यांची कीर्तन रुपी सेवा होणार आहे.


गायनाचार्य पिराजी सुळे, संभाजी हाके, दसरथ सूर्यवाड, पांडुरंग हाके, शंकर बामणे, विलास बामणे, मृदंगाचार्य ओमकार महाराज पळसवाडीकर, पवन शेळके वाडीकर आणि मौजे बेंद्री, लालवंडी, ताकबीड, टाकळगाव, पळसगाव, नायगाव, खैरगाव, गोळेगाव इत्यादी गावातील भजनीकाराची सदर कीर्तनकारांना संगीत साथ लाभलेली आहे.


सदर कार्यक्रमाचे शेवटी दोन ते तीन दिवस राहिलेले असून परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे नम्र आवाहन मा.आ. वसंतराव पाटील चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण, विजय पाटील चव्हाण, संजय बेळगे व समस्त गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
