
कंधार, सचिन मोरे। तालुक्यातील बामणी (प.क.) फाटा येथे कंधार ते नायगाव जाणारी परिवहन महामंडळाची बस क्र. एम एच २० बी एल २०५७ (दि.२७ ) दुपारी ३ वाजताच्या सुमारास रस्त्याच्या कडेला वळणावरती चढतीवर नाल्यात पलटी झाली. यात सहा महिलांसह १६ प्रवासी जखमी झाले आहेत.


कंधार बस आगारातून २:१५ वाजता चालक ईबितवार एन एम तर वाहक ठाकूर एम डी यांनी बहाद्दरपुरा व बाचोटी मार्गाने ७२ प्रवासी घेऊन निघालेल्या परिवहन महामंडळाच्या बसचा अपघात झाला असून यात १६ प्रवासी जखमी झाले असून आणखी जखमी प्रवासी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंधार आगारातून नायगावकडे बस चालली होती. दरम्यान कंधार ग्रामीण रुग्णालयात १६ जखमी प्रवाशांना दाखल करण्यात आले.


जखमी पैकी ५ जणांची दुखापत जास्त असल्याने त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही जखमी प्रवासी खासगी वाहनाने अपघात स्थळावरुनच नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी गेले असल्याची माहिती मिळाली. असून अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालय कंधार येथे पोलीस उपअधीक्षक मारोती थोरात, पोलीस निरीक्षक आर एस पडवळ परिस्थितीचा आढावा घेतला तर पोलीस कर्मचारी एस सी गिरे, भंडारे दिगंबर, बालाजी पारधे, शोभा वाघमारे यांची उपस्थित होते.


अपघातामध्ये १) शिवार आनंदा आईलवाड ३५ वर्षे, चिखली २) कृष्णाबाई गोविंदराव पांचाळ ३० वर्षे, कोलंबी ३) गिरीधर गोविंद पांचाळ ४ वर्षे, (लहान बाळ) कोलंबी ४) सदाशिव रामा कोंडेवाड ७० वर्षे, बाचोटी ५) रुक्मिणी लक्ष्मण हुंदाडे ६० वर्षे, बामणी ६) अर्चना आनंदा आईलवाड २० वर्षे, चिखली ७) नारायण दिगंबर ठाकूर ३८ वर्षे, मुक्ताईनगर कंधार वरील सर्व किरकोळ जखमी असून कंधार येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत.तर जास्त दुखापत असल्यामुळे कंधार वरुन नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.

१) संताजी हौसाजी शिनगारपुतळे ७५ वर्षे, बामणी २) श्रीकांत जळबा लूक्कडवाड १५ वर्षे, जंगमवाडी ३) गोविंद बाबुराव पांचाळ ३५ वर्षे, कोलंबी ४) मारोती धोंडीबा पवळे ७५ वर्षे, चिखली ५) अंजनाबाई कोंडीबा कांबळे ६० वर्षे, सुलतानपुरा कंधार. यामध्ये फ्रॅक्चर डोक्याला मार छातीला मार असणाऱ्या रुग्णांचा समावेश आहे.

यावेळी ग्रामीण रुग्णालय कंधार येथील डॉक्टर राजेंद्र टोम्पे, गुडमेवार दत्तात्रेय, महेश पोकले, संतोष पदमवार, ज्ञानेश्वर केंद्रे, वाघमारे बि डी तर अधिपरीचारिका कदम शितल, केळकर शिल्पा, जाभाडे अश्विनी, मयुरी रासवते, कुमठेकर प्रशांत, केंद्रे विष्णू कुमार, सुनीता वाघमारे, अनिता तेलंग, प्रियंका गलांडे, दिलीप कांबळे, बोईनवाड गुंडेराव, मोकले संभाजी, जोगदंड बाजीराव यांनी मेहनत घेतली.

कंधार शहरातील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरने दाखविले माणुसकीचे दर्शन माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता लगेच ग्रामीण रुग्णालय कंधार येथे धावून आले यामध्ये डॉ रामभाऊ तायडे, डॉ रणदिवे, संजय केंद्रे, रहीम पठाण, बाळासाहेब पवार, शेख मुनीर यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयामध्ये येऊन रुग्णांना शक्य ते मदत केली.