
नांदेड| जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत मंजुषा कापसे जाधव यांनी पंचायत समिती मुदखेड येथे भेट देऊन ग्रामसेवकांची आढावा बैठक घेतली.


आपले सरकार सेवा केंद्राचे मानधन एप्रिल अखेर जमा जि.प.कडे वर्ग करणे. राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ग्रामपंचायत विकास आराखडे अद्यावत करून अपलोड करणे. लोक अदालतीमध्ये कर वसुलीचे प्रकरण ठेवणे. तालुक्यातील 50 ग्रामपंचायतींनी ग्रामीण भागातील नमुना नंबर आठ चा नोंदी पती व पत्नीच्या नावे शंभर टक्के पूर्ण केल्याचे जाहीर करून गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी पंचायत व ग्रामसेवक यांचे अभिनंदन केले.


त्यानंतर त्यांनी डोंगरगाव या आदर्श ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यामध्ये हरघर नर्सरी अंतर्गत केलेल्या कामाची प्रशंसा केली. ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्रात भेट दिली भेटीच्या दरम्यान ही ग्राम सॉफ्ट मध्ये ग्रामपंचायत ने केलेल्या कामाची प्रशंसा करून समाधान व्यक्त केले. तसेच ग्रामपंचायतीने आपल्या केसीमार्फत गावकऱ्यांना सर्व दाखले ऑनलाईन देत असल्याची माहिती घेतली. ग्रामपंचायत डोंगरगाव यांच्याकडून ॲपच्या माध्यमातून गावकरी स्वतःच्या मोबाईलवरून ग्रामपंचायतची थकबाकी भरणा केल्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून घेतले.


एकंदरीत ग्रामपंचायत डोंगरगाव यांनी केलेल्या कामाचे पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्यावेळी गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे विस्तार अधिकारी कैलास गायकवाड ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी भास्कर कळणे, अनुप श्रीवास्तव, संतोष बिस्मिल्ले, प्रभाकर सोगे आदी उपस्थित होते.
