
नांदेड| डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पर्वा निमित्त 26 एप्रिल 2023 रोजी नांदेड येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (गुणवंत) येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.


रक्तदान शिबिराचे उद्घाटन समाज कल्याण अधिकारी बी.एस.दासरी यांच्या हस्ते झाले. यावेळी समाज कल्याण निरीक्षक पी.जी.खानसोळे, आंध्रा समितीचे अध्यक्ष जी.नागय्या सेठ, सामाजिक कार्यकर्ते लालबाजी घाटे यांची उपस्थिती होती.


डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आरोग्य विभाग पदाधिकारी बीटीओ डॉ. प्रमोद, प्रयोगशाळा तंत्रज्ञ विजयकुमार नागरगोजे, सदानंद कुरा, अतुल, शेख अब्दुल यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आयोजन गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल एस.एच.बनसोडे, 125 मुलींचे शासकीय वसतीगृहाच्या गृहपाल श्रीमती आर.डी.आडे, मुलींचे शासकीय वसतिगृह रायगडनगरच्या गृहपाल श्रीमती सुकळकर यांनी केले. यावेळी कनिष्ठ लिपीक डी.आर. दवणे व ब्रिस्क इंडिया पुण्याचे व्यवस्थापक निलेश यादव यांनी रक्तदान शिबीर पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले. यावेळी सर्व वसतिगृहाचे कर्मचारी उपस्थित होते.


समता पर्वानिमित्त होटाळा येथे अंधश्रध्दा निर्मुलन कायदा जनजागृती कार्यशाळा संपन्न
नांदेड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पर्वा निमित्त 26 एप्रिल रोजी नायगाव तालुक्यातील होटाळा येथे अंधश्रध्दा निर्मुलन कायदा जनजागृती कार्यशाळा शिबिर संपन्न झाले. सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड व स्वराज्य प्रतिष्ठान मरखेल, ता. देगलूर यांच्यावतीने होटाळा येथे कार्यशाळा घेण्यात आली.

कार्यशाळेचे अध्यक्ष सरपंच पवार हे होते. तर सामाजिक कार्यकर्ते गंगाधर कोतेवार, ग्रा.प. सदस्य व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. मुख्य मार्गदर्शक मच्छिंद्र गवाले यांनी अधंश्रध्दा निर्मूलनाबाबत कायदेविषयक सखोल माहिती प्रयोगासह दिली.

नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढ मान्यतेसाठी इच्छूक संस्थानी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणारे अभ्यासक्रम चालविण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी मंडळाचे अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यासाठी इच्छूक पंजीकृत संस्थाकडून, व्यवस्थापनाकडून तसेच यापूर्वी मान्यता दिलेल्या संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबत जाहिरात www.msbsde.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
प्रवेश सत्र 2023-24 पासून मंडळाचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या नवीन संस्थाना व अस्तित्वात असलेल्या संस्थामध्ये नवीन अभ्यासक्रम, तुकडीवाढ सुरु करण्यास मान्यता घेण्यासाठी इच्छूक संस्थानी ऑनलाईन प्रस्ताव सादर करावेत. तसेच जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे प्रस्तावाच्या 4 नस्ती 30 एप्रिल 2023 पूर्वी सादर कराव्यात. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर. बी. गणविर यांनी केले आहे.