
हिमायतनगर, अनिल मादसवार। शहरातील बोरी -उमरखेड रस्त्यावर स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रसाधना पब्लीक स्कुल हे नाविण्यपुर्ण शैक्षणिक विचार घेऊन उदयास आले आहे. भविष्यात हे शैक्षणिक संकुल उद्याच्या नव्या भारताचे उज्वल भविष्य घडविण्याकडे वाटचाल करेल. अशा शब्दात खासदार हेमंत पाटिल यांनी संचालक मंडळांच कौतुक करत अभिनंदन केल. आणि कोणतीही अडचण आल्यास मी सदैव तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास त्यांनी दिला. यावेळी राष्ट्रसाधना पब्लिक स्कुलच्या संचालक मंडळाने शाल पुष्पगुच्छ देऊन खा हेमंत पाटील यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.


ते राष्ट्रसाधना पब्लिक स्कुलच्या उद्घाटनानंतर दिलेल्या भेटीत संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षीका यांचेशी संवाद साधतांना बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना खासदार पाटिल म्हणाले की, माणसांच्या मुलभुत गरजा पैकी शिक्षण हि महत्त्वाची गरज आहे. हिमायतनगर तालुक्या सारख्या आदिवाशी बहुल भागात शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी गुरूकुल शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळाने “राष्ट्रसाधना पब्लीक स्कुल” च्या माध्यमातुन दर्जेदार नाविण्यपुर्ण शिक्षण मोठ्या शहरातच घेता येते हा विचार बाजुला ठेवण्यासाठी हिमायतनगर सारख्या ग्रामीण भागात मोठया शहरा प्रमाणेच व्यवस्था करून दिली आहे. शाळेचे विश्वस्त मंडळ, शिक्षक, शिक्षीकांचा प्रशिक्षीत स्टाफ, शहराबाहेर हवेशीर शाळेची प्रशस्त देखणी इमारत उभारून सर्वसामान्यांच्या लेकरासाठी शिक्षणासारख्या पवित्र कार्यात स्वत:ला वाहुन घेतलेल पाहुन आनंद वाटला.


या शाळेच्या जडनघडनीत ज्यांच सहकार्य लाभल अशा सर्वांच काम अभिनंदनीय आहे. अशा शब्दात त्यांनी शाळेच्या संचालक मंडळाच कौतुक करून शाळेतील अभिप्राय पुस्तीकेवर स्वत:च्या हस्ताक्षरात अभिप्राय लिहीला. शिक्षकांशी संवाद साधतांना खासदार पाटिल यांनी ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी अवघड जाते सोप करून शिकवण्या विषयी चर्चा करीत असतांना, इतर राज्यातुन आलेल्या शिक्षकांना मराठी शिकण्याचा सल्ला दिला.


यावेळी दिल्ली येथून आलेले राष्ट्रीय संघटन मंत्री, सेवा भारतीचे विजयराव पुराणिक, शिवसेनेचे मा जिल्हा प्रमुख बाबुरावजी कदम कोहळीकर, तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, भाजपाचे ता. अध्यक्ष आशिष सकवान, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, वामनराव मिराशे, विजय वळसे, राजु पाटिल सेलोडेकर, मा. नगराध्यक्ष कुणाल राठोड, संतोष गाजेवार, प्रवीण जन्नावार, श्याम रायेवार, प्रमोद तुप्तेवार, कमलाकर दिक्कतवार, सुधिर उत्तरवार, किशोर रायेवार, दासरी माला दासरी समाज संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष मुरहारी यंगलवार, बालाजी सादुलवार आदींसह शिवसैनिक, पदाधिकारी व पालक व राजकिय कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
