
हिमायतनगर, अनिल मादसवार| ज्ञानाची साधना होती म्हणून सोन्याचा धूर निघत होता. देशाची शिक्षण व्यवस्था मजबूत असेल तर देशाची प्रगती होईल. शिक्षणाचा सर्वाधिक फायदा देशाच्या विकासासाठी होणार आहे. शिक्षण म्हणजे ज्ञान होय…. माहिती व ज्ञानात मोठा फरक आहे. गुणवत्ता, मूल्य जीवन जगण्याच कौशल्य शिक्षण व्यवस्थेतून मिळत असते. त्यामुळे ज्ञान देणारी ही संस्था म्हणून उदयास यावी, राष्ट्रसाधना पब्लिक स्कुलमधून स्कील्ड बेस वैल्यूएबल एजुकेशन देऊन देशाची भावी पिढी घडवून संस्था नावारूपाला नक्कीच येईल असा विश्वास दिल्ली येतुन उपस्थित झालेले राष्ट्रीय संघटन मंत्री, सेवा भारतीचे विजयराव पुराणिक यांनी व्यक्त केला.


ते हिमायतनगर वाढोणा येथील गुरुकुल शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित राष्ट्रसाधना पब्लिक स्कुलचा उदघाटन सोहळा दि २६ एप्रिल रोजी थाटात संपन्न झाल्यानंतर उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मंचावर नांदेडचे खा. प्रतापराव चिखलीकर, किनवट – माहूरचे आ. भिमराव केराम, विधानपरिषद सदस्य राम पाटील रातोळीकर, हिंगोली भाजपचे प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर, हदगाव – हिमायतनगर विधानसभेचे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर, जिल्हा संघचालक, रा.स्व.संघ संतोषजी तिरमलवार, सुधाकर भोयर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष एड किशोर देशमुख, परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, डॉ माधव पाटील उचेकर, मोहन चव्हाण, भगवान राठोड, मधुकर उन्हाळे, आशिष सकवान आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्देची देवता माता सरस्वती आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने उदघाटन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर स्वागत गीत आणि सरस्वती स्त्रोत म्हंटल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा संस्थेच्या वतीने प्रवीण जन्नावार, श्याम रायेवार, कमलाकर दिक्कतवार, सुधीर उत्तरवार, प्रमोद तुप्तेवार यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. त्यानंतर संस्थेच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी बाबुराव कदम, आ.केराम, आ.रातोळीकर, खा.चिखलीकर यांनी शुभेच्छा दिल्या.


नांदेड जिल्ह्यात व मराठवाड्यात ही शाळा नावलौकिक करेल -खा.प्रतापराव पाटील चिखलीकर

यावेळी बोलताना खा.प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले कि, दुर्गम भागात राष्ट्रसाधना पब्लिक स्कुलने शिक्षणाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. संघाच्या शिकवणीतून ही संस्था उभी राहिली आहे. नांदेड जिल्ह्यात व मराठवाड्यात ही शाळा नावलौकिक करेल असा मला विश्वास आहे. आमच्याकडेही संस्था आहेत, संस्था चालविणे सध्याच्या घडीला अवघड बनले आहे. मात्र राष्ट्रसाधनाच्या ५ मित्रांनी हे धाडस केलं आहे. त्यांच्या या धाडसाचे मी कौतुक करतो यात त्यांना नक्कीच यश मिळेल आणि यातून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर जातील अश्या शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या. यंदाचं वर्ष मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव वर्ष साजरा केला जात आहे. यात सर्वानी सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्याम रायेवार यांनी प्रस्तावना करून संस्थेचा उद्देश सांगीतला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रवीण जन्नावार यांनी उपस्थितांचे आभार मानले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हदगाव, हिमायतनगर, किनवट व नांदेड येथून मोठ्या प्रमाणात शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित झाले होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. यावेळी उपस्थित झालेल्या सर्वांसाठी भोजन व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली होती.
