
उस्माननगर, माणिक भिसे। जोशी सांगवी ता.लोहा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील मोरे तर व्हाईस चेअरमन पदी रामदास तांबोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली . भाजपा पुरस्कृत श्री दत्त कृपा शेतकरी विकास पॅनल चे प्रमुख सुरेश मामा बास्टे यांच्या पॅनलचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे.


दि. 2 एप्रिल 2023 रोजी जोशी सांगवी ता. लोहा येथे सेवा सहकारी सोसायटीची 13 जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या गटाचे पुरस्कृत श्री दत्तकृपा शेतकरी विकास पॅनल व कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे पुरस्कृत गटाचे एकता शेतकरी विकास पॅनल आमने-सामने एकास एक उमेदवार उभे करून निवडणूक अटीतटीची केली होती. मतदारांना आपलेसे करण्यासाठी नामीशक्कल लढवून सुद्धा आमदार श्यामसुंदर शिंदे पुरस्कृत एकता शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांनी ही निवडणूक जड केली होती.


या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले होते दि. 2 एप्रिल २०२३ रोजी मतदानाच्या वेळेस तेलंगवाडी, शिराढोण तांडा, जोशी सांगवी येथील मतदारांना आणण्यासाठी वहानाची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळ पासून मतदान केंद्रावर मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्याच दिवशी संध्याकाळी उशिरा सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीची मतमोजणी केल्यानंतर मागील अनेक वर्षापासून असलेल्या सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत तटस्थ असलेल्या विद्यमान पॅनलच्या एकाही उमेदवारांना एकही उमेदवार निवडून आणता आले नाही व विजय होता आले नाही.


नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर गटाचे पुरस्कृत श्री दत्तकृपा शेतकरी विकास पॅनल प्रमुख भाजपा कंधार तालुका उपाध्यक्ष तथा तेलंगवाडीचे माजी सरपंच सुरेश मामा बास्टे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल मधील तेरापैकी तेरा उमेदवार प्रचंड मताने निवडून आले होते. दिनांक 25 एप्रिल रोज मंगळवार या दिवशी सकाळी 11 वाजता जि.प.प्रा .शाळा जोशीसांगवी येथे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या निवडीचे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अध्यक्षस्थानी निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून बी .बी .पवार यांच्या अध्यक्षतेखाली सदरील निवड करण्यात आली यावेळी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिया खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे विश्वासू सामाजिक कार्यकर्ते माझी सरपंच संजय पाटील मोरे यांची चेअरमन म्हणून तर व्हाईस चेअरमन म्हणून रामदास तांबोळी यांची बिनविरोध निवड केल्याचे निर्वाचन अधिकारी बी.बी.पवार यांनी घोषणा करून सर्व सेवा सहकारी सोसायटीतील निवडून आलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या .

यावेळी सुरेश मामा बास्टे .कंधार भाजपा उपाध्यक्ष यांनी व गावकऱ्यांच्या वतीने निवडून आलेल्या चेअरमन, व्हाईस चेअरमन व सभासद यांचा पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला .व निवडणुकी मध्ये प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष भेटून ,फोनद्वारे मतदार बंधूभगिनी नातेवाईकांनी ,मित्र मंडळीनी खूप मेहनत घेऊन सेवा सहकारी सोसायटी जोशीसांगवी ही बहुमतानी निवडून दिल्यामुळे निवडणुक प्रमुख सुरेश मामा बास्टे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
