
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव तालुक्यातील नरसी येथे आज दि. २९ एप्रिल २०२३ रोजी प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दिव्य शोभायात्रा निघणार आहे.


दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही नरसीतील ग्रामदैवत श्रीराम मंदिर जुने गावातून शोभायात्रा निघणार आहे. भव्यदिव्य श्रीरामाची मुर्ती, बाहुबली हनुमान, काली माता क्रेन लाईटसह महापुरुषांच्या प्रतिमा आणि हजारो रामभक्त श्रीरामाचा गजर करीत मुख्य चौरस्त्यावर येईल. परिसरातील रामभक्तांनी या भव्य दिव्य शोभायात्रेत सहभागी होवून लाभ घ्यावा.


असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अंकुश खनपटे, पांडुरंग खनपटे, सोमेश शेटकर, सतीश गौड, अनिल श्रीरामवार, प्रवीण पाळेकर, सतीश गणगोपलवाड, बाजीराव मेटकर, संतोष मांजरमे, प्रशांत शिरगिरे, राम पललवाड, दीपक तळणीकर, बालाजी मानेमोड, संदीप जाधव,प्रदीप जोशी आदींनी केले आहे.

