
नांदेड| भाजपा महानगर सरचिटणीस क्षितीज जाधव यांच्या वतीने दि. 27 एप्रिल रोजी आयोजित प्रसिद्ध गायक संतोष जोंधळे यांच्या बुद्ध-भीम गित कार्यक्रमास उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला. अवकाळी पाऊस, वादळी वारा असतानाही या वादळी वार्यावर भिम गितांच्या वादळांनी मात केली. वादळी वार्यातही आंबेडकरी प्रेमी नागरिक पाय रोवून कार्यक्रमात उपस्थित होते.


शहरातील भगिरथ नगर येथे आयोजित या बुद्ध भिम गितांच्या कार्यक्रमाचे खा. प्रताप पा. चिखलीकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी महानगरध्यक्ष प्रविण साले, मिलिंद देशमुख आदी अनेकांची उपस्थिती होती.


कार्यक्रमाची सुरुवात होताच प्रसिद्ध गायक संतोष जोंधळे यांनी ‘झुकेगा नाही साला मै हूॅ डॅशींग जयभीमवाला’, गावामध्ये गाव महु गाव, आदीसह अनेक बुद्ध भिम गिते गावून आंबेडकरी प्रेमी नागरिकांना मंत्रमुग्ध केले. केवळ भिम-बुद्ध नाही तर छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचेही गित गावून कार्यक्रम सर्व समावेशक केला. यामुळे वादळवारा असतांनाही आंबेडकरी प्रेमी नागरिक जागेवरुन तसुभरही हलले नाहीत. विविध गाण्यांची मेजवाणी त्यांना मिळाली.


या कार्यक्रमास डॉ. सचिन उमरेकर, बालाजी बच्चेवार, आशिष नेरलकर, मारोती वाघ, सोनू कल्याणकर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रम मशस्वी करण्यासाठी क्षितीज जाधव मित्र परिवराचे अमोल गोधने, किरण फुले, धम्मा येडके, भिमरत्न राजभोज, महेश जोंधळे, अमर सोनसळे, राजू कपोळे, पप्पू कोल्हे, पप्पू कांबळे, पवन जाधव, विकी चव्हाण, आकाश लेवडे, गौरव पाटील जाधव, राजू साठे, सचिन कपाळे, कपिल तिमेवर, संदिप जोंधळे, प्रशांत धाकपाडे, रवि सरोदे, गजानन येरावार, ओम यादव, राष्ट्रपाल भालेराव,शिवाजी पांचाळ, रतन लोखंडे, सुनिल नरवाडे, देवेंद्र मस्के, अरविंद गोधणे, गोविंद पुंडगे आदी परिश्रम घेतले.
