Tuesday, June 6, 2023
Home करियर जिज्ञासा’ अभ्यासिकेतील सहा विद्यार्थी “पोलीस दलात तर दोघे शिक्षक पदासाठी पात्र..NNL

जिज्ञासा’ अभ्यासिकेतील सहा विद्यार्थी “पोलीस दलात तर दोघे शिक्षक पदासाठी पात्र..NNL

by nandednewslive
0 comment

लोहा| शहरातील जिज्ञासा अभ्यासिकेत ग्रामीण व शहरी भागातील होतकरू गरजवंत विद्यार्थ्यासाठी आणि अभ्यास स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अभ्यासिकेची सोय सात वर्षापूर्वी करण्यात आली. यंदा आठव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या अभ्यासिकेत पोलीस भरतीच्या पहिल्या टप्प्यात सहा विद्यार्थी पोलीस दलात नोकरीसाठी पात्र ठरले तर दोन विद्यार्थ्यांनी टेट शिक्षक पात्रता परीक्षेत्र यश मिळविले आहे. धावरी तांडा येथील एक विद्यार्थी भारत सरकार टाकसाळ (नाणे) नाशिक येथे नौकरील लागला आहे. आता पर्यंत २८ विद्यार्थी नोकरीला लागले आहेत.

जिज्ञासा अभ्यासिका ही ग्रामीण व शहरी भागातील होतकरू विद्यार्थ्याना अल्प फिस आकारली जाते. ७ मार्च २०१६ मध्ये ही अभ्यासिका जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, संपादक शंतनु डोईफोडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्या मार्गदर्शना खाली गरजवंत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची सोय उपलब्ध करून दिली जाते.

राज्यात पोलीस भरती- शिक्षक भरती साठी प्रवेश परीक्षा झाल्या. मुंबई पोलीस भरती- इतर जिल्हयातील भरतीचे काही निकाल येणे बाकी आहे पहिल्या टप्प्यात जिज्ञासा अभ्यासिकेतील संतोष राजाराम पांचाळ (गोलेगाव) यांची सिंधुदुर्ग पोलीस, म्हणून निवड झाली. मेघराज शंकर ठेंबरे बेरली, रत्नागिरी पोलीस) मारोती धुळगंडे (पेंडू ता. पालम – यवतमाळ पोलीस, ) माधव दहिकळंबे (दगडसांगवी, यवतमाळ पोलीस) सतीश बालाजी गिरी (बेरळी , मीरा भाईंदर पोलीस ) गजानन पवार (भाद्रा- ठाणे पोलीस) यांची निवड झाली आहे. पुढील मे महिन्यात ते ड्यूटीवर जाणार आहेत.

टेट शिक्षक पात्रता परीक्षेत्र मुक्तेश्वर रामराव बटलवाड (दगडसांगवी), दिंगबर पंढरी पंदलवाड (लोहा) है विद्यार्थी पात्र ठरले आहेत. धावरी तांडा येथील राजकुमार शिवाजी पवार हे नाशिक येथील भारत सरकारच्या टाकसाळ मध्ये रुजू झाला आहे. जानेवारी महिण्यात पाच विद्यार्थी सैन्यदलात भरती झाले आहेत. काही विद्यार्थ्यांचा निकाल येणे बाकी आहे. जिज्ञासा मध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार पोलीस अभ्यासिकेत निरीक्षक, मुख्याधिकारी विविध विभागाचे प्रमुख यांचे प्रसंगानुरूप मार्गदर्शन ठेवले जाते. जिज्ञासा’ अभ्यासिकेला भूमीपुत्र मान्यवरांची नेहमीच साथ व प्रेरणा मिळाली आहे.

सेवानिवृत्त कृषी अधिकारी माणिकराव मुकदम, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, प्रा डॉ डी एम पवार, जिजामाता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार, मार्गदर्शक माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, दिनेश तेललवार, हरिभाऊ चव्हाण, दीपक कानवटे, हिरालाल घंटे, जीवनराव घंटे , सोनू संगेवार, शरद पाटील, व शहरातील मान्यवरांनी नेहमीच प्रेरणा दिली आहे. या यशस्वी विद्यार्थ्याचे जिज्ञासा’ चे संचालक काशीनाथ शिरसीकर, हरिहर धुतमल संचालक प्रविण धुतमल, रत्नाकर महाबळे, इमाम लदाफ व्यवस्थापक बालाजी धनसडे, तनय धुतमल, बालाजी ढवळे, यांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!