
उस्माननगर, माणिक भिसे। जिल्हा परिषद .कें.प्रा. व कन्या प्रा.शाळेच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२३- २०२४ साठी ईयत्ता पहीली वर्गात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यासाठी शासन आदेशानुसार शाळा पुर्व तयारी मेळावा क्र.1 उत्साहात घेण्यात आला .


या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डायट कॉलेजचे अधिव्याख्याता मा.श्री.चंद्रमोर्य हे होते तर ,उद्घाटकन मा.वसंत मेटकर( शिक्षण विस्तार अधिकारी प.स.कंधार ) यांच्या हस्ते फित कापुन मेळाव्याची सुरूवात करण्यात आली , केंद्र प्रमुख श्री जयवंतराव काळे यांनी प्रासत्तावीक केले.


नाव नोंदणी श्री.पांडागळे आर एस. वजन सौ.डांगे आशा उंची , श्री खान सर यांनी घेऊन टेबल वाईज विद्यार्थी यांना प्रवेश दिला , टेबल क्र.1 शारीरिक विकास सौ.लोलगे मिनाक्षी , टेबल क्र, 2 बौद्धिक विकास सौ.गाजुलवाड प्रेमला टेबल क्र.3 सामाजिक व भावनिक विकास सौ.देशमुख मंजुषा , टेबल क्र.4 भाषा विकास श्रीम. आलेवाड सुशिला टेबल क्र.5 गणन पूर्व तयारी श्रीम.पाटोदेकर सुनंदा, टेबल क्र.6 मार्गदर्शन श्री एकनाथ केंद्रे या सर्वांनी उत्कृष्ट रित्या विद्यार्थी यांचे मूल्यमापन करुन ,शारीरिक बौद्धिक ,भावनिक ,सामाजिक भाषिक ,गणनपूर्व यावर क्रुती करून घेतल्या व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले .


सौ विद्मा वांगे यांनी या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले. कार्यक्रमास कें. प्रा शाळेचे अध्यक्ष मा.धनंजय घोरबांड ,कन्या शाळेचे अध्यक्ष मा.ज्ञानेश्वर घोरबांड , सदस्य मा.राम मोरे , ग्रा.पं.सदस्य मा गंगाधर भिसे, मा.गित्ते सर तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते ,या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री केंद्रे ई.एस.यांनी केले तर आभार श्री सोनकांबळे सर यांनी केले , कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुर्यवंशी प्रल्हाद ,सिरसाळकर अनिरुद्ध यांनी सहकार्य केले.
