
नांदेड। राज्य शासनाचा वाढीव मोबदला आणि इतर थकीत मानधणासाठी तसेच महापालिका क्षेत्रात रिक्त असलेल्या आशांच्या जागा तातडीने भराव्यात यासाठी दि.2८ एप्रिल रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा फेडरेशनने दि.२४ रोजी दिला होता.


त्या ईशाऱ्यांची दखल घेत महापालिकेने पुढील पाच दिवसात थकीत मानधन आणि वाढीव मोबदला देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. तसे पत्रशहर आरोग्य विभागाचे समन्वयक श्री सोनुले यांनी संघटनेस दिले असून त्या पत्रावर आरोग्य अधिकारी यांची स्वाक्षरी आहे.


लेखी आश्वासणामुळे नियोजित ठिय्या आंदोलन रद्द करण्यात आले आहे. त्यानंतर उपस्थिता पैकी काही अशांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन मागील दोन महिन्यापासून सुरु असलेल्या सीटू च्या आंदोलनास पाठींबा दिला. दि.२३ फेब्रुवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माकप, सीटू आणि अ.भा.जनवादी महिला संघटनेचे विविध मागण्यासाठी आंदोलन सूरू आहे.जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत आणि अप्पर जिल्हाधिकारी पी.एस. बोरगावकर यांनी काही मागण्या सोडविल्या आहेत.परंतु काही मागण्या अजून अपूर्ण आहेत त्या म्हणजे शहरतील प्रजा बालक विद्या मंदिर या बोगस शिक्षण संस्थेवर कारवाई करावी.तसेच तेथे अध्यापणाचे कार्य केलेल्या शिक्षिका आशा गायकवाड व केशव धोंगडे यांना केलेल्या कामाचा मोबदला देण्यात यावा.


मौजे वझरा शेख फरीद येथील सुचविण्यात आलेली जमीन गावठाण विस्तारवाढ योजनेसाठी माहे जून पूर्वी अधिगृहन करावी व अर्जदारांना प्लॉट वाटप करावेत. मौजे मांजरम ता.नायगाव येथील उपोसनार्थी गंगाधर मेडकर व रावसाहेब मेटकर हे अपहार झाल्या प्रकरणी गुन्हे दाखल करावेत म्हणून साखळी उपोषण करीत आहेत. त्यांच्या मागण्या सोडवाव्यात.

माहूर वन परीक्षेत्र अधिकारी प्रा.यांचेवर निलंबनाची कारवाई करावी व सीटू च्या वन मजुरांना कामावर घ्यावे. आदी प्रमुख मागण्यासह इतरही मागण्या अपूर्ण आहेत. उर्वरित सर्व मागण्यासाठी मागील दोन महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीटू,माकप व जमसंचे आंदोलन सुरू आहे.या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. उज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.जयराज गायकवाड, कॉ.श्याम सरोदे, कॉ.सोनाजी कांबळे,गंगाधर मेडकर, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड, रावसाहेब मेटकर आदी करीत आहेत.
