
उस्माननगर, माणिक भिसे। तळपत्या उन्हामुळे व उन्हाची चाहूल लागताच शेत शिवारातील वृक्षांची पानझड होत आसते ., अशा अवस्थेत वैशाखात फुलण्याचे वरदान असलेल्या गुलमोहाराने नागरीकांचे मन लक्ष वेधून घेत आहे.


उन्हाळ्यात पान झडीमुळे शेत शिवारातील वृक्ष उजाड दिसतात .आंबा ,लिंब ,वगळता इतर सर्वच झाडांची पानझड होत आसते. परंतु गुलमोहर मात्र उन्हाळ्यातही बहरात येतो . विशेषतः फळ आणि फुलांनी गुलमोहर सजवलेल्या प्रमाणात नटून सजून बसल्याचे चित्र पाहायला मिळते.


यामुळे उन्हाळ्यात ही नैसर्गिक सौंदर्याचा आनंद नागरिकांना मिळत असतो. असाच गुलमोहर उस्माननगर ता.कंधार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिसरात फुलला आहे.तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ.श्याम सावंत यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि सामाजिक वनीकरण,रोजगार सेवक यांनी कडक उन्हात लहानपणा पासून ते मोठे होई पर्यंत जोपासना केली.रोपटे ते वृक्ष होई पर्यंत आळे करून टॅकरने पाणी पुरवठा करून जोपासना केली.प्राथमिक आरोग्य दवाखान्यात आलेल्या रूग्णांना प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे.


थोडावेळ झाडाखाली बसून राहावे असे वाटते.दवाखान्याच्या उंच जमिनीवर वाढलेली ही वृक्ष सद्यस्थितीला लाल रंगाच्या फुलांनी आणि तलवारीच्या पात्या सारख्या शेंगानी लखाटले आहे.प्राथमिक आरोग्य दवाखान्यातील हा गुलमोहर रूग्णांना व नागरिकांना भावला असून अनेक लोक सदरील वृक्षाकडे पाहून सेल्फी काढत आहेत. दरम्यान तळपत्या उन्हातही फुलण्याची अन झुलण्याची किमया दाखवत असलेल्या गुलमोहराकडे पाहून जगण्याची जिद्द बाळगत असलेल्या वृक्षाकडे पाहून सकारात्मक दृष्टिकोन जपला जाऊ शकतो ,अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.
