
नवीन नांदेड। वासवी व वनिता क्लब सिडको नवीन नांदेड व श्री बालाजी मंदिर देवस्थान आनंदसागर सोसायटी, हडको नादेड याच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात प्रथम वासवी माता जन्मोत्सव २०२३ निमित्ताने श्री वासवी महाकुंभ आयोजीत श्री वासवी माता महापुराण कथेची सांगता व १०२१ महिलाचे कुकूंमार्चन ३० एप्रिल रोजी करण्यात आली असून महाप्रसादाचे आयोजन बालाजी मंदिर देवस्थान हडको येथे करण्यात आले आहे.


वासवी ,वनिता क्लब सिडको व बालाजी मंदिर देवस्थान आनंदसागर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वासवी माता जन्मोत्सव सोहळा २०२३ निमित्ताने वासवी महाकुंभ आयोजन, करण्यात आले असून श्री वासवी महायज्ञ १०२ यजमान असलेला श्री वासवी महायज्ञ, १०२१ महिलांचे सामुहिक कुकुमार्चन, श्री वासवी माता महापुराण कथाचे संगीतमय झाकी सहित वासवी उपासक प.पु. आशिषानंदजी महाराज धारुरकर यांच्या समधुर वाणीतून दि. २४ ते एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली होती.


या सोहळ्याला मुख्य यजमान शिवानंद गणेशराव निलावार सौ. छाया शिवानंद निलावार हे होते, ३० एप्रिल रोजी माता वासवी जयंती निमित्ताने आयोजित महायज्ञ व कथा सांगता, व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सम्पांती सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन धार्मिक समिती प्रमुख लक्ष्मण रेवणवार,वासवी क्लब सचिव बालाजी कवटीकवार, कोषाध्यक्ष संदीप येरावार, स्वागत समिती अध्यक्ष अरूण दमंकोडवार, वनिता क्लब सचिव सौ. सुनिता बालाजी कवटीकवार, कोषाध्यक्ष सौ. कोमल संदीप येरावार, यांनी केले आहे.

