
नांदेड। अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाने समाजातील बेरोजगार मुला-मुलींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन आज केले होते. या मेळाव्यास ब्राह्मण समाजातील बेरोजगार उमेदवारांच्या मुलाखती होऊन या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, असेच मिळावे यापुढेही आयोजित करावे असे पालक वर्गातून बोलल्या जात होते.


ब्राह्मण समाजातील मुला-मुलींना बुद्धिमत्ता असूनही नौकरीपासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे बेरोजगारांचे प्रमाण वाढवून त्यांच्या पुढील जीवनास विविध अडचणी येत होत्या. याचा विचार करून अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ शाखा नांदेडचे जिल्हाध्यक्ष बंडोपंत कुंटूरकर यांनी समाजातील मुला-मुलींच्या रोजगारासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते .हा मेळावा आज दिनांक २३ एप्रिल रोजी साई लॉन्स मालेगाव रोड नांदेड येथे संपन्न झाला.


मेळाव्याचे अध्यक्षस्थानी बाळासाहेब पांडे अध्यक्ष अभिनव शिक्षण संस्था नांदेड हे होते. तर ह. भ. प .चैतन्य महाराज कंधारकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून विप्र ब्राह्मण समाजाचे गंगाबिशन कांकर, शितल खांडील यांची उपस्थिती होती .या रोजगार मेळाव्याची सुरुवात दीप प्रज्वलन व भगवान परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन करून झाली .यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या या रोजगार मेळाव्यात ६० उमेदवारांनी नोंदणी केली होती.


या रोजगार मेळाव्यास पुणे ,मुंबई, बेंगलोर येथील आठ ते दहा कंपन्यांचे व्यवस्थापक मुलाखती घेण्यास आले होते. उमेदवारांची लेखी परीक्षा घेऊन नंतर प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या व लगेच त्या मुलांना निकाल देऊन त्यांना लवकरच कॉल लेटर देण्यात येणार आहे. असा रोजगार मेळावा महाराष्ट्रात प्रथमच बहुभाषिक ब्राह्मण महासंघ शाखा नांदेड यांनी आयोजित केल्यामुळे जिल्हा कार्यकारिणीचे सर्वांनी कौतुक केले व या रोजगार मेळाव्यास उमेदवारांनी पण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दरवर्षी असे रोजगार मिळावे आयोजित करावे असे पालक वर्गातून विनंती करण्यात येत आहे. आता यापुढे बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचा १० मे रोजी सामुदायिक उपनयन संस्कार व ११ मे रोजी संत संमेलन होणार आहे. आजच्या मेळाव्याचे प्रास्ताविक प्रा. रमाकांत जोशी चिखलीकर यांनी केले व मेळाव्यास जिल्हाध्यक्ष बंडोपंत कुंटूरकर, सखाराम कुलकर्णी ,डॉक्टर दीपक केसरी ,ॲड. राजूरकर, गोविंदराव चौधरी ,सौ. स्मिता अवस्थी ,जगदीश कुंटूरकर ,तुकाराम पांडे, भालेराव, सरदेशपांडे यांच्यासह ब्राह्मण समाजाचा ब्रह्मवृंद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.
