
सोलापूर। CEO दिलीप स्वामी यांचे संकल्पनेतून शिक्षण विभागात राबविलेले विविध नाविण्यपुर्ण उपक्रमास पुणेतील शिक्षण परिषदेच उस्फुर्त प्रतिसाद मिळाला . सिईओ दिलीप स्वामी यांनी सादरीकरण करून सर्वांची वाह..वा मिळविली . दशसुत्री व स्वच्छ सुंदर शाळा उपक्रमाने शिक्षण परिषदेत बाजी मारली .


राज्याच्या शिक्षण विभागाने समग्र शिक्षा व स्टार्स प्रकल्प अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी यांची दोन दिवशीय निवासी कार्यशाळा लोणावळा येथील अॅम्बे व्हॅली सिटी येथे आयोजन करणेत आले होते . राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर , राज्याचे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल , शिक्षण आयुक्त सुरज मांढरे प्रमुख उपस्थित होते . या परिषदेचे साठी सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेले विविध उपक्रम राबविले बद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप यांना खास निमंत्रण देणेत आले होते . सोलापूर हून माध्यमिक शिक्षणाधिकारी जावेद शेख , शिक्षणाधिकारी प्राथमिक संजय जावीर , डॉ . रामचंद्र कोरडे , सुलभा वठारे प्रमुख उपस्थित होते .


राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर व शिक्षण आयुक्त सुरज मांढरे हे दोघेही सोलापूर जिल्ह्याचे दौरावर आले असता त्यांनी या उपक्रमाचे कोतुक केले होते . आज लोणवळा येथील कार्यशाळेत त्यांनी सविस्तर सादरीकरण ऐकून दोघेही भारावून गेले .


सिईओ दिलीप स्वामी यांचे दमदार सादरीकरण- लोकसहभागातून राबविलेले सायकल बँक व स्वच्छ सुंदर शाळा उपक्रमा बरोबर शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडविणारा दशसुत्री या उपक्रमाचे दमदार सादरीकरण सिईओ दिलीप स्वामी यांनी केले . प्रत्येक पत्राचा ड्राफ्ट स्वत बसून लिहून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली असल्याचे त्यांनी सांगितले . नियोजन , अंमलबजावणी त्या मधीस त्रुटींची पुर्तता व अभियान पुर्ण होई पर्यंत पाठपुरावा या सर्व बाबी कटाक्षाने पाळल्या . शिक्षक व अधिकारी व कर्मचारी यांचा विश्वास संपादन केले मुळे हे शक्य झाले असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले .

शिक्षण परिषदे मध्ये लोकसहभागाचे कौतुक … ! स्वच्छ व सुंदर शाळा या अभियानामध्ये शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी व मुख्याध्यापक , प्राथमिक शिक्षक यांनी सात कोटी पेक्षा अधिक रक्कम जमवून कोरोनाच्या काळात केलेल्या या कामाचे कौतुक करणेत आले .

सायकल बँकेने मारली बाजी .. ! ज्या योजनांना शासनाचा निधी नाही . परंतू गरीब मुलींची हेळसांड होऊ नये या उदात्त हेतुने राबविलेली सायकल बँक या नाविण्य पुर्ण उपक्रमास परिषदेच भरभरून प्रतिसाद मिळाला .

तीन उपक्रमाची होणार राज्यात अंमलबजावणी !
सोलापूर जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांचे संकल्पनेतील सायकल बँक , दशसुत्री , स्वच्छ व सुंदर शाळा या उपक्रमाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करणे साठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद चे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज सादरीकरण पाहिले नंतर या उपक्रमाचे सविस्तर प्रस्ताव देणेचे सुचना सिईओ दिलीप स्वामी यांना केल्या . या प्रमुख उपक्रमाची राज्यात अंमलबजावणी करणेत येणार आहे .