
नवीन नांदेड। जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचलित शिवाजी विद्यालय, सिडको शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळविले असून यश संपादन केलेल्या विधार्थी यांच्ये अभिनंदन केले आहे.


या यशाबद्दल शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेल्या गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख एस आर भोसीकर यांचे संस्थेचे उपाध्यक्ष तथा उपमुख्याध्यापक रवी शिवाजीराव जाधव,शाळेचे मुख्याध्यापक प्रा. एस.एम. देवरे, पर्यवेक्षक एन.एम भारसावडे व नरसिंह विद्यामंदीर प्रा. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. व्ही.ए.एकुंडवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


यावेळी सहशिक्षकएस.आर.बिरगे,एस. ए.कोरडे, एस.डी. शिंदे,बी.बी.पाटोळे,
एस.एन शिंदे,के.एल.जोगदंड, एस.टी.मोरे,एस.एन.देवकर उपस्थित होते.सदर परीक्षेसाठी शिवाजी विद्यालयातील एकूण ८३ विद्यार्थी बसले होते.त्यापैकी ११ विद्यार्थी पात्र झाले तर ५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.


शाळेतील कु. सोनेकर अक्षरा अनंता,शेळके श्रीकांत बालाप्रसाद, लोंढे कन्हैय्या अवधुत,कु.मोतेवार सृष्टी सुनिल,कु. उत्तरवार अनुष्का किशोर, आगलावे सोहम माधव, कु.पाटील श्रेया शिवाजी,कच्छवे साईप्रसाद गजानन, कु.ठाकुर अनुष्का गोकुलसिंह, जाकोरे गणेश प्रकाश व कु. तुपकरी अमृता गजानन हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.

राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता.मुखेड या संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव ,संस्थेचे उपाध्यक्ष तथा उपमुख्याध्यापक रवी शिवाजीराव जाधव, शाळेचे मुख्याध्यापक प्रा.एस.एम.देवरे, पर्यवेक्षक एन.एम भारसावडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंकर कापसे,नामदेव कोनापुरे व एम. पी. हवा यांनी परिश्रम घेतले.

सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एन.एम. एस.एस.) ही मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जाते.आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते.सदर शिष्यवृत्ती १२ वी पर्यंत मिळते.
