
नांदेड| ग्रामीण भागातील युवकांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळेच महापुरुषांचे विचार खेड्यापाड्यात घेऊन जाण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे, असे मत युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांनी केले.


नायगाव तालुक्यातील दरेगाव येथे युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांच्या पुढाकारातून शनिवारी (दि. 29) महात्मा बसवेश्वर महाराज, क्रांतिपिता महात्मा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आले. त्यावेळी दरेगावकर बोलत होते.


यावेळी सोनू दरेगावकर यांच्यावतीने गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. दरेगावकर पुढे म्हणाले की, शहरी भागातील लोक आज आपला इतिहास आणि ग्रामीण भागातील लोकांना विसरून जाताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य देऊन त्यांच्या मनामध्ये शैक्षणिक वातावरण प्रफुल्लीत निर्माण करण्यासाठी महापुरुषांच्या विचारांची ज्योत ही खेड्यापाड्यात जाण्याची आज खरी गरज आहे, असेही सोनू दरेगावकर म्हणाले.


यावेळी दरेगाव नगरीचे माजी सरपंच प्रदीप पाटील शिंदे, ग्रामपंचायत सदस्य मोहन बेलके, पांडुरंग पाटील शिंदे, बळी पाटील शिंदे, नारायण बैलके, देवीदास बैलकवाड, उत्तम बैलके, हरी बैलकवाड, दत्ता बैलके, कपिल बैलकवाड, पिंटू बैलकवाड, राजकुमार बैलके, सचिन बैलके, सतीश बैलके, गणेश दरेगावकर यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक व महिला आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
