
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव तालुक्यात गेल्या चार दिवसापासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. दिनांक 30 रोजी दुपारी जोरदार पाऊस व वादळी वारे सुटल्यामुळे देगांव येथील पोस्ट आॅफिस कार्यालया जवळील दोन सिमेंटचे विद्युत पोल व इतर पोल मोडकळीस आले व झाडे तुटल्यामुळे ग्रामपंचायत परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.


नायगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून जोरदार पावसासह वादळवारा, गारपीट होत आहे. या पावसात अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, अनेकांच्या घरावरचे पत्रे उडून गेल्यामुळे संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले व अनेक ठिकाणी जनावरे दगावली आहे. दिनांक 30 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान जोरदार गारा पावसासह वादळ सुटल्यामुळे नायगाव शहरासह परिसरातील अनेक गावांत झाडे, विद्युत पोल तुटून पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. खंडित झालेला विद्युत पुरवठा रात्री उशिरा सुरू होईल अशी श्यक्यता आहे.


विशेष म्हणजे ग्रामपंचायत डीपी मागील दहा दिवसापासून नादुरुस्त आहे. परिसरातील नागरिक यातना भोगत असताना आता निसर्गामुळे दुहेरी संकट उभे टाकले आहे. कालच नवीन डीपी गावात दाखल झाली होती त्यामुळं नागरिक काहीसे सुखावले असताना नैसर्गिक संकटाने मात्र परत एकदा संकटात टाकले आहे.


सदरील घटना स्थळी देगावचे सरपंच डॉ. दत्ता मोरे यांनी भेट देऊन घटनेची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली व तात्काळ दुरुस्ती करण्याची विनंती केली व तसेच गावातील जीर्ण झालेल्या पोल ची संभाव्य काळजी घेत महावितरण कडे वाढीव दहा पोलची मागणी देखील केली व ती अधिकाऱ्याने मान्य केल्याचे सरपंच यांनी सांगितले. घटना घडताच लाईनम्यॅन कारताळे हे सुद्धा घटना स्थळी हजर झाले. व रस्त्यातील पडलेले तार बाजूला करून रस्ता मोकळा करून दिला.
