
हदगाव। येथील आर्य वैश्य समाजाच्या वतीने माता कन्यका परमेश्वरी वासवी मातेची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


यानिमित्त दीप प्रज्वलन व वासवी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी समाजाचे माजी अध्यक्ष शिरीष मनाठकर यांनी वासवी मातेच्या जीवन चरित्रा बद्दल माहिती सांगितली त्यानंतर वासवी मातेचे स्त्रोत्र ,. अन्नपूर्णा मातेचे स्तोत्र पठण करण्यात आले. त्यानंतर वासवी मातेची आरती महिला मंडळाचे अध्यक्ष सौ. शरयु मनाठकर व शिरीष मनाठकर यांनी केली.


यावेळी समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास दमकोडवार यांनी बोलताना म्हणाले की श्रीवासवी माता जयंती आपण मागील वर्षापासून सुरू केली असून पुढील वर्षी आपण भव्य शोभायात्रा काढु या शोभायात्रेला सर्व समाज बांधव व भगिनींनी मोठा सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा असे यावेळी त्यानी सांगितले.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम वट्टमवार सर यांनी तर आभार महासभेचे सहसचिव प्रभाकर पत्तेवार यांनी मानले. वासवी माता जयंतीला सर्व समाज बांधव , सर्व भगिनी ,युवती उस्फूर्तपणे मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम आर्य समाज मंदिर येथे संपन्न झाला .
