
नवीन नांदेड। सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालय सिडकोचे प्रा. डॉ. रावसाहेब दोरवे हे २५ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत, या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब जाधव यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालय सिडको येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून प्रा. रावसाहेब दोरवे हे १ सप्टेंबर १९९७ रोजी रुजू झाले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून १४ वर्ष काम पाहिले तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चा ऊत्कृष्ट अधीकारी म्हणून पुरस्कार मिळाला, सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले असून महाविद्यालयास राष्ट्रीय सेवा मध्ये अनेक पुरस्कार मिळाले आहेत.


३० एप्रिल रोजी २५ वर्ष ७ महिने २१ दिवस सेवा बजावून सेवानिवृत्त होत असल्याबद्दल जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालय सिडको येथे सेवानिवृत्ती निमित्ताने प्रा. दोरवे यांच्या सपत्नीक सत्कार सकाळी ११ वाजता सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष सौ. शांता देवी जाधव, नगरसेवक तथा संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीनिवास जाधव, मास्वे संघटनेचे अध्यक्ष डॉ. अंबादास मोहीते, प्राचार्य डॉ. डब्ल्यू, आर, मुजावर यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थित मध्ये आयोजित करण्यात आला आहे.

