
नवीन नांदेड। श्री दत्तात्रय शिक्षण प्रसारक मंडळ सिडकोचा छत्रपती शिवाजी विघालय हडकोचे मुख्याध्यापक सर्जेराव स्वामी मोरे हे ३५ वर्षाच्यी प्रदिर्घ सेवा करून ३० एप्रिल रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असलल्या बदल संस्थेचे सचिव राजेश महागावे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने सपत्नीक सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.


छत्रपती शिवाजी विघालय हडको नांदेड येथे सर्जेराव मोरे हे १५ जुन १९८७ रोजी मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले, सेवा काळात संस्थेचे व्यवस्थापन करत करत भारताची, जनगणना, साक्षरता अभियान, लोकसभा निवडणुका अशी अनेक राष्ट्रीय कार्ये पार पाडली, अध्ययन-अध्यापनासोबत आपण शैक्षणिक क्षेत्रभेट, आनंदनगरी, आर.टी.ओ., पोलीस स्टेशन, पोस्ट कार्यालयात विद्यार्थ्यांच्या भेटी आयोजन केले होते, शाळेत संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय अध्ययावत ठेवली.


शिक्षणाच्या गोडीमुळे श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी, देश-विदेशात शिक्षणासाठी व नोकरीसाठी पोहचले आहेत, त्यामुळे विद्यालयाच्या प्रगतीच्या चढत्या आलेखात व नावलौकिकात मोलाची भर पडली आहे. आपल्या अतुलनीय कार्यामुळे, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार २००८ महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक पुरस्कार-२०१६ आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवंत शिक्षक पुरस्कार २०१७ इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.


३० एप्रिल २३ रोजी मुख्याध्यापक या पदावरून ३५ वर्ष सेवा करून सेवानिवृत्त होत असल्याबद्दल सचिव राजेश महागावे,शाळेतील शिक्षक विलास महागावे, बी. बी. बिराजदार, बि. डी. पवार, जि. बी. मोरे, एस. एस पांडागळे, एस.डबलु ढवळे, सौ. डेगेटोले, सौ, मुरकुटे, सौ. घोडके नागरे, व पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुख्याध्यापक मोरे यांच्या २९ एप्रिल रोजी सपत्नीक सत्कार व भेट वस्तू देऊन सन्मान केला.
