
नांदेड| देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १३० करोड जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी मन की बात हा अभिनव उपक्रमाचा शंभरावा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेड जिल्ह्यात मन की बात कायक्रमाचे १ हजार गावात प्रसारण भारतीय जनता पार्टीच्यावतीने आयोजित करण्यात आले. नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पावडेवाडीत जावून प्रचंड जनसमुदायासमवेत मन की बात कार्यक्रम पाहिला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा १०० वा कार्यक्रम संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेड जिल्ह्यात खा. चिखलीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष प्रविण साले यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करय़ण्यात आले होते. या कार्यक्रमास जनतेने उत्सफूर्त प्रतिसाद दिला. खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शहरालगत असलेल्या पावडेवाडी येथे जावून गावकऱ्यासमवेत मन की बात कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. पंतप्रधान मोदी यांच्या अखंडीत मन की बात या कार्यक्रमाचा १०० वा कार्यक्रम जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.


मन की बातचा १०० वा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध आघाड्यांची स्थापना करण्यात आली होती. ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्षांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मन की बातचा १०० वा कार्यक्रम नांदेड शहरात २१६ ठिकाणी मोठ्या पडद्यावर दाखविण्याची व्यवस्था स्थानीक पातळीवर करण्यात आली. भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगांवकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात मोठ्या पडद्यावर दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली होती असे खा. चिखलीकर यांनी सांगितले.


पावडेवाडी येथील मन की बात कार्यक्रमात खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासमवेत भाजपा शहरजिल्हाध्यक्ष प्रविण साले, मिलींद देशमुख, बंडू पावडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. देगलूर तालुक्यातील शेळगांव येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर यांच्यासमवेत जिल्हा संघटन सचिव गंगाधरराव जोशी, तालुका अध्यक्ष शिवाजीराव कनकंटे, मन की बात जिल्हा संयोजक शिवकुमार देवाडे यांच्यासह शेळगांव परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी लोहा शहरातील मन की बात कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. लोहा तालुक्यातील किवळा येथील कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदेड शहरातील रामानंदनगर येथे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रविण साले, सरचिटणीस विजय गंभीरे, नायगांव शहरातील कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर तर नरसी येथील मन की बात कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, मुखेड तालुक्यातील धामणगांव येथील कायर्यक्रमास जिल्हा सरचिटणीस माधवराव उच्चेकर, नांदेड शहरातील कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा प्रवक्ते प्रल्हाद उमाटे सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदी यांच्या शंभराव्या कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरीकांनी मोठ्या उत्सफूर्तपणे प्रतिसाद दिला हे विशेष!
