
उस्माननगर। कांचननगर ( एकदरा ) ता.जि.नांदेड येथील सामाजिक युवा कार्यकर्ते ,तथा सर्वाच्या सुखदुःखात धावून येणारे युवा नेतृत्व असलेले सचिन मरिबा खंदारे यांचा वाढदिवस साधेपणाने व विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांचननगर ( एकदरा ) ता.जि.नादेड येथील शाळेत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल भाऊ पावडे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व फळाचे वाटप करण्यात आले.


वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना वही ,पेन ,पाटीचे वाटप करण्यात आले.यावेळी नांदेड शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल भाऊ पावडे , सरपंच गजानन कदम , उपसरपंच रघुनाथ दुधमल वसमत , मुख्याध्यापक, शाळेतील सहशिक्षिक , तसेच चांदू सुर्यतले , साहेबराव धोंगडे ,विशाल धो. देवानंद खंदारे ,सुरज साबळे ,दीपक हिंगोले , आकाश केदारे किरण खंदारे ,ज्योतिबा हिंगोले सतिश खंदारे ,चांदू धोंगडे मित्र मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या.

