
बिलोली, गोविंद मुंडकर। बिलोली शहर व परिसरात दुपारी चक्रीवादळ मुसळधार पावसामुळे अनेक झाडे बुडातुन तुटून पडले तर अनेक घरांचे पत्रे उडाले , विजेचे खांब देखील आडवे पडले विजांचा कडकडाट सह जोरदार अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच धावपळ उडाली. याबाबत प्रशासनाने मात्र अत्यंत निष्काळजीपणाचे दर्शन घडवले. लोकांना मदत करणे तर दूर त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी टाळाटाळ करण्यात आल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.


दि ३० एप्रिल 2023 रोजी दुपारी ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सह जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली . दुपार नंतर अनेक वेळा मुसळधार पावसाने हजेरी लावली. कन्या शाळेजवळील पिंपळाचे झाड पडल्याने कारचे नुकसान झाले.


यावेळी शाळेच्या खोलीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले . शहरातील विविध ठिकाणची सर्व पत्रे उडून घराचे व संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले, बिलोल येथील वादग्रस्त तलाठी यांनी नुकसानीची पाहणी करणे तर दूर संपर्क टाळण्याचे सांगण्यात आले. नायगाव तालुक्यात यापूर्वी त्यास पदावन्न करण्यात आले होते.. शहरात दोन ठिकाणी विजेचे खांब वाकले दुपार पासून शहरातील विज पुरवठा खंडित झाला असून १३ खांब व १८ ठिकाणी तार तुटले आहे जोडणीचे काम सुरू असल्याची माहिती महावितरण चे साहायक अभियंता अनिल ठिकार यांनी माहिती दिली.

