
नवीन नांदेड। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सिडकोचे शाखाधिकारी विठ्ठल पवळे यांनी सेवाकाळात ऊत्कृष्ट सेवा देऊन , उलेखनीय कार्य केले असून, त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन ऊत्कृष्ट शाखाधिकारी म्हणून गौरव करण्यात आल्याचे नाजिमसह बँकेचे संचालक शिवराम लुटे यांनी आपल्या मनोगत प्रसंगी केले.


१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त सिडको नाजिमसह शाखा येथे शाखाधिकारी विठ्ठल पवळे यांच्या सेवानिवृत्त निमित्ताने निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामराव पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून संचालक शिवराम लुटे, माधव शिंदे, शाखाधिकारी डोगंळीकर यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती, यावेळी
लुटे यांनी नांदेड जिल्ह्यातील ऊत्कृष्ट म्हणून सेवा बजावली असुन शाखे अंतर्गत सभासद सुरक्षा ठेव, यासह सभासद यांना एटीएम कार्ड वाटप, शाखे अंतर्गत मिळालेल्या अनुदाचे वाटप यासह विविध निधी सभासद बांधवांना वितरित केले असून हि शाखा जिल्ह्यात नावलौकिक झाल्याचे सांगितले, तर शिवाजी पाटील टाकळगावकर, माजी नगरसेवक अशोक मोरे, दता पाटील टरके, यांच्या सहीत मान्यवरांनी गेल्या सहा वर्षे सेवाकाळात झालेल्या उल्लेखनिय कार्याचा लेखाजोखा मनोगतुन व्यक्त केला.


यावेळी शाखा सिडको यांच्या वतीने नुतून शाखाधिकारी डोगंळीकर, रोखपाल राजीव देशमुख, सचिव विलास कवडे, यांनी सेवानिवृत्त शाखाधिकारी विठ्ठल पवळे यांच्या सपत्नीक सत्कार करून भेट वस्तू दिली तर नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, पत्रकार तिरूपती पाटील घोगरे व छायाचित्रकार सारंग नेरलकर, सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सतिश कदम यांनी पवळे व परिवारातील सदस्य यांच्या भव्य दिव्य सत्कार सोहळा केला, या वेळी शाखे अंतर्गत असलेल्या आठ गावातील सभासद बांधवानी यथोचित सन्मान केला.


शाखाधिकारी विठ्ठल पवळे यांनी नाजिमसह बकेचे वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ऊत्कृष्ट शाखा होण्यासाठी ,सेवा सोसायटी चेअरमन,सचिव व शाखे अंतर्गत असलेल्या आठ गावातील सभासदांनी केलेल्या सहकार्य मुळे मला ऊत्कृष्ट शाखाधिकारी पुरस्कार व शाखेत सुरक्षा ठेव अभियानाला मिळालेल्या सहकार्य मुळे हे शक्य झाल्याचे सांगितले, शाखेला सेवानिवृत्ती झाल्या नंतरही अडी अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न शिल असल्याचे सांगितले.

या सोहळ्याला माधवराव ढाकणीकर, संरपच धनाजी पाटील आढाव, उपसरपंच शिवकुमार पाटील आढाव, पंडित पाटील,बालाजी पाटील ढगे, हणमंत पाटील मोरे,राजेश पाटील मोरे, नारायण पाटील, मारोती टरके,धोंडीबा मस्के, प्रभाकर पाटील आढाव, बाबुराव पाटील मस्के,यांच्या सह शाखे अंतर्गत असलेल्या गावातील संरपच,उपसरपंच,सेवा सोसायटी चेअरमन,व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन संजय ऊचेगावकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवक मारोती टाक, भगवत पराडकर, ज्ञानेश्वर दुंधबे व मित्र परिवार यांनी सहकार्य केले.
