
उस्माननगर, माणिक भिसे। राष्ट्रीय महामार्गावरील रोडवर मध्येभागी गुत्तेदाराने गोळेगाव पाटी पासून मुखेड कडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी गिट्टी टाकून ठेवल्याने अनेक दुचाकीस्वारांना त्रास होत असून किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. अनेक वाहनचालक जखमी झाले असल्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.


नांदेड ते उस्माननगर ,शिराढोण गोळेगांव. बिदर मार्गावरील रोडवर येणारे जाणारे लहान,मोठे वाहनांची वर्दळ असते.या परिसरातील अनेक वाहनचालक रात्री अपरात्री येत असताना मोटारसायकल स्वार जखमी होत आहेत.


नुकतेच शहादत्त महाराज सरेगांव ता.मुदखेड हे गोळेगाव येथे कार्यक्रमासाठी येत असताना मध्यभागी असलेल्या गिट्टीवरून कोसळल्याने जखमी झाले आहेत. यांच्यासारखे अनेक वाहनचालक गिट्टीच्या ढिगामुळे नहाक त्रास भोगावा लागत आहे.गुत्तेदाराने महामार्गावरील रोडवर जागोजागी गिट्टीचे ढिग टाकून ठेवल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना परेशानी होत आहे. संबधित विभागाने लक्ष देऊन या महामार्गावरील गिट्टीचे ढिग काढून टाकण्यास सांगावें अशी मागणी या परिसरातील चालक,व जखमी चालक यांच्या वतीने होत आहे.


डिवायडरवरील गटुचे काम बोगस – राष्ट्रीय महामार्गावरील उस्माननगर येथील डिवाडरच्या गटूचे अतिशय खराब काम करून गुत्तेदार पळवीत आहे.या डिवायडरवरील गटू फिट बसत नाही.आतमध्ये माल बरोबर न टाकता गटू थातूरमातूर लावून काम पळवित आहेत.कामावर पाण्याचा वापर केलेला नाही.ज्याठिकाणी गटु बसवले आहेत.त्या कामांवर पाणी टाकले नव्हते .कृपा वरूणराजाची त्या डिवायडरवरील गटू ला पाणी लाभले.

थातूरमातूर गटू बसविण्यात येत आहेत.संबधित अधिकारी यांनी लक्ष देऊन काम दर्जेदार करून घ्यावे असी मागणी होत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील नांदेड ते बिदर मार्गावरील लाखो रुपयांची वृक्षांची तोड करण्यात आली.पण या महामार्गांवर अद्ययावत वृक्ष लागवड करण्यात आली नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
