
नवीन नांदेड। १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त सिडको नवीन नांदेड येथे प्रशासक भुजंगराव गायकवाड तर मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे डॉ. रईसौधदीन शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण आयोजित करण्यात आला होता.


१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त सिडको नवीन नांदेड येथील कार्यालय येथे प्रशासक भुजंगराव गायकवाड यांच्या हस्ते तर मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त डॉ .मोहमंद रईसौधदीन यांच्या हस्ते करण्यात आला.


या ध्वजारोहण सोहळ्याला परिसरातील माजी नगरसेविका प्रा. ललिता शिंदे, जेष्ठ नागरिक, बि.आर.मोरे, मुकुंदराव बोकारे,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी , पत्रकार यांनी उपस्थित होते, सिडको कार्यालयाचे लिपीक संकेत गिरी यांच्या सह सुरक्षा रक्षक व सिडको क्षेत्रीय कार्यालय चे कार्यालय अधिक्षक विलास गजभारे, स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे, कर निरीक्षक सुधीर बैस, यांच्यासह वसुली लिपीक दिपक पाटील, चव्हाण, आरकुले,यांच्या सह मातृ सेवा आरोग्य केंद्र येथीलकर्मचारी उपस्थित होते.

