
नवीन नांदेड।सामाजिक कार्यकर्त्या विजयाताई गोडघासे यांना अहिल्याबाई होळकर यांना २०१६ _१७ सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व रोख रकमेच्या धनादेश देऊन १ मे रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महाराष्ट्रदीना निमित्ताने पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.


सामाजिक कार्यातील विशेष कार्य व महिला बाल विकास क्षेत्रात मोलीक योगदान बदल महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सौ. विजया गोडघासे सन्मानित करण्यात आले, यावेळी जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची उपस्थिती होती.


दि 1 मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय पोलीस परेड मैदान येथे सामाजिक व महिला बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबदल पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले,यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर,आमदार बालाजी कल्याणकर ,जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कृष्ण कोकाटे, महिला बाल विकास अधिकारी कांगणे यांच्या सह मान्यवराचा उपस्थिती मध्ये देण्यात आला. सौ गोडघासे यांना पुरस्कार मिळाल्या बदल माजी नगरसेविका ललिता शिंदे,ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, डॉ.अशोक कलंत्री, यानी अभिनंदन केले आहे.

