
हिमायतनगर। तालुक्यातील मौजे खडकी फाटा येथील सायप्रस इंग्लीश मेडीयाम स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांनी पाचवी स्काॅलशिप परीक्षा दिली होती यात ते पात्र ठरले आहेत.


शाळेतील एकूण 9 विद्यार्थ्यां सण 2022-23 साठी बसले होते. त्यापैकी कु. श्रुती वाढोंणकर, यश माने ,शारदा कप्पलवाड, या तिन विद्यार्थी पाचवी स्काॅलरशिपला पाञ झाले आहेत. या तिन्ही मुलाचे संस्थेचे अध्यक्ष दिलीप राठोड, मुख्याध्यापक दिनेश राठोड यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. श्रद्धा कप्पलवाड ही विद्यार्थीनी आर.टी.ई.नुसार मोफत शिक्षण घेत होती हे विशेष होय.

