
नवीन नांदेड। श्री नृसिंह जयंती कार्यक्रम सोहळा नरोबा देवस्थान मंदिर कौठा येथे ४ एप्रिल रोजी सकाळी महा अभिषेक,सायंकाळी जन्मोत्सव व महाआरती, सायंकाळी ४ वाजता भव्य मिरवणूक आयोजन करण्यात आले, असुन २८ एप्रिल ते ४ मे दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता तर ५ मे रोजी काल्याचे कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नृसिंह जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण शिवमहापुराण कथा व नृसिंह जयंती आयोजित करण्यात आली असून, कथा प्रवक्ता हभप बालाजी महाराज गुडेवार यांच्या समधुर वाणीतून दररोज १ ते ४ दरम्यान आयोजित करण्यात आली. सप्ताह मध्ये दैनंदिन काकडा, अभिषेक, गाथा भजन, ज्ञानेश्वर पारायण व शिव महापुरायण कथा दि. २८ एप्रिल ४ मे दरम्यान आयोजित करण्यात आला.


ह.भ.प.श्री. वासुदेव महाराज कोलंबीकर यांच्ये तर ह.भ.प. शरदचंद्र महाराज देगलुरकर, हभप काशिनाथ महाराज माने, ह.भ.प. योगेश महाराज अग्रवाल ह.भ.प. बालाजी महाराज गाडेवाडी, ह. भ. प. श्री. विश्वनाथ महाराज काकांडीकर याचे सप्ताह मध्ये किरतन झाले तर श्री नृसिंह जयंती निमित्ताने गुरुवार दि. ०४ मे २३ रोजी महाअभिषेक सकाळी ५.३० वाजता श्रींची मिरवणुक सायं. ४.०० वाजता जन्मोत्सव व महाआरती सायं. ६.४५ वाजता, ५ मे रोजी काल्याचे किर्तन सकाळी १० ते १२ ह.भ.प.श्री. चंद्रकांत महाराज लाठकर याचे होणार आसुन महाप्रसाद भंडारा आयोजित करण्यात आला आहे.या सोहळायाला भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक श्री नृसिंह नरोबा मंदिर, बसवेश्वरनगर, जुना कौठा, नांदेड व सर्व भक्त व गावकरी मंडळी यांनी केले आहे.

