
नांदेड| 21 जुन हा अंतराष्ट्रीय योग दिन म्हणुन सर्वत्र साजरा केला जातो. योगा एका दिवसांपर्यंत मर्यादित न रहाता नियमीत करणे आवश्यक आहे. या उददेशाने केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने दिनांक 02 मे 2023 रोजी “ योग महोत्सव “ अंतराष्ट्रीय योग दिनाच्या 50 दिवसांपुर्वी काउंटडाऊन कार्यक्रमाचे या विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


नांदेड शहरातील कामगार कल्याण भवनाच्या सभागृहात योग विदयाधाम नांदेडच्या सयुक्त विदयमाने आयेाजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी योग विदयाधाम नांदेड चे उपाध्यक्ष रमेश केंद्रे, एस.डी.पवार, केंद्रीय संचार ब्यूरो नांदेड चे सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल, सचिव एम.डी. नल्लावार, श्रीमती अष्टुरकर, आदींची उपस्थीत होती.


योग महोत्सवाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमाच्या प्रारंभी एस.डी.पवार, रमेश केंद्रे आणि एम.डी. नल्लावार यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करण्यात आला. यात आजच्या धकाधकीच्या जिवनात योगाची आवश्यक समजुन घेण्यात आली आणि विवीध आसनांचा सराव यावेळी करण्यात आला. तसेच विवीध रोगांपासून रोगमुक्त होण्यासाठी आवश्यक आसनांची माहिती देखील एस.डी.पवार यांनी दिली.


विवीध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहभागातून आयेाजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यकमात सजामाता कलामंच नांदेडच्या कलाकारांनी योगाचे महत्व या विषयावर आधारित नाटीकेचे सादरीकरण करून उपस्थीतांची मने जिकंली. योगाचे महत्व या विषयावर शहरातील छत्रपती चौक, महाराणा प्रताप चौक, नमस्कार चौक या ठिकाणी पथनाटयाचे सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अंतिम टप्यात अंतराष्ट्रीय योग दिनापर्यंत शहरी तसेच ग्रामीण भागात विवीध जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून योगाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. तसेच योगा हा केवळ वयोवृध्दासाठी नसून युवा वर्गाला डोळयासमोर ठेवून अभियानांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहीती सुमित दोडल यांनी दिली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमित दोडल यांनी केले तर एम.डी. नल्लावार यांनी आभार मानले.
