
नवीन नांदेड। सामाजीक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांसाठी राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे दिला जाणारा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार 2019-20 साठी सिडकोच्या सामाजीक कार्यकर्त्या डॉ. सौ. सुरेखा कलंत्री यांना पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते १ मे रोजी प्रदान करण्यात आला.


महाराष्ट्र शासन यांच्या वतीने डॉ. सौ.सुरेखा कलंत्री यांनी महिलांसाठी वेळोवेळी विविध आरोग्य शिबिराचे आयोजन तसेच विविध महाविद्यालय व विविध महिला मंडल येथे महिलांच्या आरोग्य बाबतीत व यापूर्वी त्यांना सिडकोच्या विविध सामाजीक संघटनेतर्फे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.तसेच सध्या त्या सिडको येथील वात्सल्यनगर गृहणी संस्थेच्या संचालीका असून महाराष्ट्र शासन बालकल्याण मंडळ नांदेडच्या सदस्या म्हणुन कार्य केले.


यापूर्वी त्या गुरुगोविंद सिंग स्मारक रुग्णांलयाच्या अभ्यागत मंडळ व जिल्हा हुंडा निर्माण समितीवर देखील त्यांनी उत्कृष्ठ कार्य केले आहे.तसेच त्या भिवराज कलंत्री नर्सिग संस्था सिडको नांदेडच्या संचालिका असून आदर्श परिचारिका घडवण्याचे कार्य देखील केले आहे, १ मे महाराष्ट्रदिनी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पोलिस परेड मैदान नांदेड याठिकाणी पुरस्कार वितरण प्रदान करण्यात आला.


त्यांना प्रशिस्तीपत्र सन्मान चिन्ह ,व अकरा हजार रुपये धनादेश देवून सन्मानीत करण्यात आले.यावेळी नांदेड जिल्हयाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी राऊत,जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ सुनिल लहाणे, महीला बालविकास अधिकारी कागणे यांच्या सह मान्यवराचा उपस्थिती होती.
