
नांदेड| महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात कार्यरत असणाऱ्या तथा पत्रकारांच्या मागण्या संदर्भात लढा देत व सर्व सामान्य जनतेच्या मागण्या संदर्भात सुद्धा अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या हदगाव तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकारितेती पत्रकार शेख चांदपाशा यांची निवड जाहीर करण्यात आली तर हदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकारितेतील पितामह म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे व्यक्तिमत्व कॉम्रेड तथा ज्येष्ठ पत्रकार श्यामप्रसाद लाहोटी यांची नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.


सदरील निवड ही राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी, राज्य अध्यक्ष संतोष जाधव यांच्या आदेशानुसार व मराठवाडा कार्याध्यक्ष प्रकाश कोल्हे यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकरसिंह ठाकूर यांनी निवडीचे पत्र देऊन त्यांना सन्मानित केले व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.


यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष मारोती शिकारे, जिल्हा उपाध्यक्ष जुनेद शेख, संजय राक्षसे, जिल्हा संघटक सुनील जोशी, जिल्हा महासचिव कलीम शेख, जिल्हा सचिव तुळशीराम लुंगारे, पत्रकार शेख नसिर, नांदेड जिल्हा कोषाध्यक्ष सौ गीता ठाकूर, पत्रकार स्वाती सोनकांबळे, ज्योती कदम, अश्विनी सोनवणे, शोभा खिल्लारे, सविता बेटके, शिवकांता आचेगाये व मनीषा कदम इत्यादी उपस्थित होते.

