Sunday, June 11, 2023
Home करियर श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या संचालक पदी डॉ. मनेश कोकरे यांची नियुक्ती -NNL

श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या संचालक पदी डॉ. मनेश कोकरे यांची नियुक्ती -NNL

by nandednewslive
0 comment

नवीन नांदेड। महाष्ट्रात व देशात अभियांत्रिकी क्षेत्रात नामांकित आसलेल्या श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपूरी नांदेडच्या संचालक पदी डॉ. मनेश कोकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या नियामक मंडळ बैठक कक्षात एक बैठक घेण्यात आली या बैठकीत डॉ. मनेश कोकरे यांना संचालक पदाचे नियुक्ती पत्र संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य सौ. राजश्रीताई हेमंत पाटील, गुरुद्वारा लंगर साहेब नांदेडचे संत बाबा बलविंदर सिंगजी तसेच संस्थेच्या नियमक मंडळाचे सदस्य बाबा सुखविंदर सिंगजी यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी संस्थेतील विविध अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनांक २ मे २०२३ रोजी डॉ. मनेश कोकरे यांनी मावळते संचालक डॉ. यशवंत जोशी यांचे कडून संचालक पदाचा कार्यभार स्विकारला. याप्रसंगी नियामक मंडळ सदस्य सौ राजश्रीताई पाटील, संत बाबा बलविंदर सिंगजी, नवनियुक्त संचालक डॉ. मनेश कोकरे, मावळते संचालक डॉ. यशवंत व. जोशी यांनी समयोचित विचार मांडले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे प्रबंधक डॉ. प्रकाश जी. जाधव यांनी केले,डॉ.मनेश कोकरे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, संस्थेत्त संशोधन प्रकल्प उभारणे, फॉरेन कोलबरेशन वाढवणे, नवीन स्टार्टअप सुरु करणे, विद्यार्थी असतानाच उद्योग सुरु करण्याची आवड निर्माण करणे, इन्कुबेशन सेंटर सुरु करणे, एन आर एफ गुणानुक्रमांकानुसार पहिल्या शंभर क्रमांक मध्ये येण्यासाठी प्रयत्न करणे, संस्थ्येची गुणवत्ता वाढऊन विद्यार्थी प्रवेशा चे वेळी संस्थेस प्रथम प्राध्यान्य दिले पाहिजेत या साठी प्रयत्न करणे इत्यादी बाबीवर भर देणार असल्याचे सांगितले.

११ ऑगस्ट १९७२ रोजी पणदरे, ता. बारामती, जिल्हा पुणे येथे डॉ.मनेश कोकरे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. यांनी त्यांचे पदवी व पदयुत्तर आभियांत्रिकी शिक्षण बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स – (१९९०-९३), एम. ई. इलेक्ट्रॉनिक्स (१९९६-९९) या काळात श्री गुरुगोविंद सिंग जी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथून पूर्ण केले. तर संशोधनकार्य (पीएच.डी.) आय.आय.टी. खरगपूर येथून (२००१-२००४) या काळात पूर्ण केले. गुंणवतेच्या बळावर त्यांनी २०११-१२ मध्ये (पोस्ट डॉक्टरल डीग्री) बॉईजकास्ट यकोस पोस्ट डॉक्टरल रिसर्च फेलोशिप ही पदवी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (यू.एस.ए.) येथून पूर्ण केली.

या संस्थेत (श्री गुरुगोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड) आधीव्याखाता, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यपक ईत्यादी पदावर काम करत असताना डॉ. मनेश कोकरे यांनी हॉस्टेल वार्डन, परीक्षा विभाग प्रमुख, कॉर्डिनेटर (सेंटर ऑफ एक्सलन्स इन सिग्नल इमेज प्रोसेसिंग), प्रोफेसर इन्चार्ज इंनोवेशन लॉबरेटरी, विभाग प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स विभाग, एनबीए कॉर्डीनेटर, अधिष्ठाता (संशोधन), अधिष्ठाता (वित्त), आणि अधिष्ठाता (अकॅडमीक) इत्यादी पदावर २८ वर्षे उत्कृष्ट कार्य करून संस्थेच्या विकासात सहभाग नोंदवलेला आहे.

त्यांच्या नावावर शोध प्रबंध – १२०, सायटेशन इंडेक्स – ३०२६, विविध प्रोजेक्ट मार्फत संस्थेला ७४९.२ लाख निधी मिळवून दिला, इम्पॅक्ट फॅक्टर ७५.००, त्यांच्या मार्गदर्शनात १५ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली असून व सहा विद्यार्थी पीएच.डी. करत आहेत. त्यांनी पदयुत्तर पदवी विद्यार्थ्यांना गाईड म्हणून काम केलेले आहे. आजपर्यंत ४ रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत, कॉन्फरन्स आयोजित-२, वर्कशॉप व एसटीटीपी- १२, भारतात व परदेशात ४०० व्याख्याने दिलेली आहेत. समिक्षक २५ इंटरनॅशनल जनरल, इंडस्ट्री कन्सल्टन्सी-२.

डॉ. एम बी कोकरे यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे ज्यात २००४ – IAPR Travel Bursary Award (ट्रॅव्हल बर्सरी अवार्ड), २००५ – एआयसीटीई करिअर अवॉर्ड फॉर यंग टीचर, २००९ – २०२२ बेस्ट पेपर अवॉर्ड, २००९ बेस्ट अच्युमेंट इन करिअर अवॉर्ड, २०११ – बाईजकास्ट फेलोशिप, २०१३ – युनिव्हर्सिटी बेस्ट टीचर अवार्ड, २०२०- एआयसीटीई विश्वेशरया बेस्ट टीचर अवार्ड, २०२०-२३ उच्च दर्जाचे सायंटिस्ट च्या यादीत समावेश.

श्री गुरुगोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथे संचालक पदावर डॉ. मनेश कोकरे यांची नियुक्ती झाल्या बद्धल संस्थेचे नियामक मंडळाचे अध्यक्ष व सदस्य, संस्थेतील विविध अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!