
नविन नांदेड। महीलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेणाऱ्या जिल्ह्यातील तिन पुरुषांची निवड केली जाती या मध्ये समाजात स्त्रियांना समानतेने वागविणारे व महिलांना माणूस म्हणून अधिकार जपणाऱ्या पुरुषांचा ‘सुधारक’ सन्मान पुरस्काराने बळीरामपूर ग्राम पंचायतचे माजी सदस्य प्रतिनिधी तथा गेल्या अनेक वर्षा पासुन सामाजीक कार्यात सक्रीय सहभाग नोंदवणारे सामाजीक कार्यकर्ते संजय केरबा सोनकांबळे यांना सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


दि १ मे रोजी महाराष्ट्र कामगार दिनाचे औचित्य साधून पोलीस अधिक्षक कार्यालय पोलीस परेड मैदान येथे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिष महाजन याच्या हस्ते हा पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर आ. बालाजी कल्याणकर ,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक कृष्णा कोकाटे , यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला .


हा पुरस्कार महीला आर्थिक विकास महामंडळ नांदेड मार्फत नव तेजस्विनी कार्यक्रमांतर्गत जेंडर व न्यूट्रीशन या घटकाकरीता वर्ष २०२२-२३ वर्षांच्या नियोजनाप्रमाणे या पुरस्काराचे देण्यात आला आहे.


या उपक्रमाचा मूळ हेतू म्हणजे सर्व गाव पातळीवर महिला सक्षमीकरणा करीता पुरक वातावरण तयार करणे हा आहे. महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांनी महिलांचे २७२ नामांकन तालुका पातळीवर प्राप्त हक्क व अधिकार करत यासाठी लढा दिला. महिलांना माणूस म्हणून जगण्यासाठीचे नामांकन तालुका स्तरीय समितीने हक्क व शिक्षणाची संधी मिळवून निवडून पाठविलेल्या नमांकना मधून देण्यास क्रांतिकारक काम केलेले आहे.

जिल्हास्तरीय समितीने संजय केरबा सोनकांबळे ( बळीरामपूर ) यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पूरस्कार १ मे महाराष्ट्रदिनी देण्यात आला या पूरस्कारा बदल त्यांचे मित्र मंडळी व्हाईस ऑफ मिडीया पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल धमने, इकवीटास बँकेचे मॅनेजर हर्षराज सोनवणे,कॉग्रेस चे रमेश तालीमकर , गणेश जिंदम, शिवाजी मगर , त्यांचा सत्कार सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
