
नांदेड। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदेड तालुक्यातील विजयी उमेदवार व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी यांच्या सत्कार सोहळा माजी पालकमंत्री डि. पी. सावंत व आमदार मोहनराव हंबरडे यांच्या हस्ते आ. हंबरडे जनसंपर्क कार्यालय कौठा येथे आयोजित २ मे रोजी करण्यात आले.


नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबरडे यांच्या वतीने नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नुतून संचालक मंडळ यांच्या व सहकार्य करणारे सरपंच, उपसरपंच . सदस्य व प्रमुख पदाधिकारी यांच्या सत्कार माजी आमदार डि. पी.सावंत,आमदार मोहनराव हंबरडे यांच्या उपस्थितीत आमदार जनसंपर्क कार्यालय कौठा येथे २ मे रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पालकमंत्री डि. पी. सावंत यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादी,काँग्रेस पक्षाशी एकजुट करून शेतकरी विकास पनलचा माध्यमातून एकतर्फी विजय कृषी उत्पन्न बाजार समिती वर मिळवला असल्याचे सांगितले.


माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीने नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये अठरा पैकी १७ जागेवर विजय संपादन केल्या बद्दल आमदार मोहनराव हंबरडे मतदारांचे आभार मानले, व मतदारांनी या पुढे ही महाविकास आघाडीला साथ देण्याचे आवाहन केले.


कौठा येथील आ.हंबरडे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे नुतून संचालक भुजंग पाटील डक,नागोराव आढाव, गांधी पवार, सत्यजित भोसले, गंगाधर शिंदे, यांच्या व माजी संचालक दिपक पाटील,नांदेड तालुका क्रागेस कमिटी अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे,माजी जिल्हा परिषद सदस्य आंनद गुंडीले विठ्ठल पावडे,,पंचायत समिती चे माजी सदस्य भुजंग राव भालके, सुनिल पवार, काकांडी माजी सरपंच सुदीन बागल,बाबुराव गाडेगावकर, विष्णुपूरी चे माजी सरपंच राजु हंबरडे, वाजेगाव शेख जमील, पंचायत समिती उपसभापती प्रतिनिधी अब्दुल फयुम, बाभुळगाव संरपच पुंडलिक मस्के, वांगी दता पाटील, बोढार बाळु पाटील तिडके,तुपा चिमणाजी ,शेख चाद पाशा,किक्की सिध्दनाथ,गोपाळ चावडी,नागापूर, वडगाव,भनगी, खुपसरवाडी, कल्हाळ,धनगरवाडी,पांगरी,पिपंळगाव मिश्री, कारेगाव,यांच्या सह दक्षिण विधानसभा मतदार संघातील अनेक गावातील संरपच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व आजी माजी पदाधिकारी यांच्या सत्कार उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक शिवराम लुटे यांनी केले , या सोहळ्याला राहुल हंबरडे,जयसिंग हंबरडे, राजु मोरे, दिपके, तुकाराम पवार,यांच्या सह दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
