
नांदेड/हिमायतनगर। तालुक्यातील मौजे जवळगाव येथे मंगळवारी दुपारी दोन गटात हाणामारी व दगडफेक झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, घटनेची माहिती मिळताच मोठया प्रमाणात पोलीस कुमक येथे दाखल झाली. या प्रकरणी अंदाजे 18 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हदगाव – हिमायतनगर तालुक्यातील मौजे जवळगाव येथे उमरखेड तालुक्यातील एका लग्नाच्या वरातीच्या नाचण्याच्या कारणाने वाद निर्माण झाला. यावेळी दोन गट आमने-सामने आले त्यात दगडफेक झाल्याचे यात अनेकजण जखमी झाले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. यामुळे दोन्ही गटात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून, परिस्थिति हाताळण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी परिस्थिति नियंत्रणात आनली असल्याचे सांगितले जात आहे. सध्या जवळगाव परीसरात तणाव पुर्ण शांतता आहे. या प्रकरणी 18 जणांवर 353 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचे सांगितले आहे.


पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या सूचनेवरून पोलीस निरीक्षक बी डी भुसनुर व इस्लापुर ठाण्याचे सपोनि वाव्हूळे यांच्या पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला होता. या घटनेला जबाबदार असलेल्या संशयित काही व्यक्तीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोणत्याही प्रकारचा अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये,असे आवाहन पोलीसानी केले आहे.


हिमायतनगर जि. नांदेड मौ. जवळगाव येथे आरोपीतांनी मस्जिद जवळ रोडवर डी. जे. वर गाणे वाजविण्याचे कारणावरून गैरकादयाची मंडळी जमवुन मा. जिल्हा दंडाधिकारी साहेब नांदेड यांचे जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन करून जवळगाव येथील मस्जिदचे मौलाना यांचे चितावणी वरून हातात विटकरी व दगड घेवुन सैरावैरा फेकण्यास सुरूवात केली. यातील फिर्यादी व साक्षीदार हे समजावण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यांना धक्काबुक्की करून त्यांचे दिशेन दगडफेक करून शासकीय कामास अडथळा निर्माण केला. अशी फिर्यादीपोनि. बिरप्पा धोंडीबा भुसनर यांनी दिल्यावरुन पोस्टे हिमायतनगर येथे गुरनं 100/2023 कलम 353, 109, 323, 143, 147, 149, भादवी सह कलम 135 मुपोका कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा तपास सपोउपनि. पाटील, मो.क्रं. 8282055370 हे करीत आहेत. अशी प्रेसनोट पोलिसांच्या वतीने जरी करण्यात आली आहे.