
नवीन नांदेड। वडगावचे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जयवंतराव काळे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत त्यांची आई स्व. सुभद्राबाई संभाजीराव काळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ गावातील होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व इतर तरुण पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा या उद्देशाने सर्व गुणवंताचा जि.प.प्रा.शाळा वडगाव येथे हार,स्मृती चषक व रोख रक्कम देवून सन्मानित केले.


आईच्या व्दितीय पुण्यस्मरण निमित्ताने ३ मे २३ रोजी जिल्हा परिषद शाळा वडगाव येथे गावातील गुणवत्त विधार्थी सत्कार सोहळा आयोजित केला होता,


यावेळी गावचे सरपंच सरस्वती बाई विनायकराव काळे,उपसरपंच रावसाहेब राठोड,पोलिस पाटील विघाबाईकानगुले ,चेअरमन नारायण कल्याणकर, व्हा.चेअरमन देविदासकाळे ,शा.व्य.स.अध्यक्ष बालाजी कल्याणकर व तंटामुक्त अध्यक्ष शंकरराव काळे, माधव भवर, प्रल्हाद कल्याणकर, परसराम काळे, अविनाश काळे, साईप्रसाद काळे ,शाळेच्या मुख्याध्यापक प्रविण पाटील ., गावातील सर्व सन्माननिय सदस्य व गावकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले,यात प्रवीण बडूरवार , दत्ता कल्याणकर, हनमंत गोरडे,राम तिरवड,संभाजी गोरडे,कु.संजिवनी भवर,कु.अनुसया डेमेवार यांना सन्मानित करण्यात आले.


राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जयवंत काळे वडगाव गावामध्ये नेहमीच सामाजिक कार्यात आग्रेसर असून तनमनधनांने विविध उपक्रम राबवित असतात,त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी शाळेचे मु.अ.व सर्व शिक्षक व विद्यार्थी ,पालक ,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
