
नांदेड। दक्षिण मध्य रेल्वे ने काचीगुडा ते बिकानेर दरम्यान विशेष गाडीच्या 16 फेऱ्या चालविण्याचे ठरविले आहे. ते पुढील प्रमाणे : –


गाडी क्रमांक 07053 काचीगुडा ते बिकानेर हि विशेष गाडी काचीगुडा येथून दर 6 मे ते 24 जून दरम्यान दर शनिवारी रात्री 21.30 वाजता सुटेल आणि मेडचल, वाडियाराम, कामरेड्डी, निजामाबाद, बासर मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नंदुरबार, सुरत , वडोदरा , गेरतपूर , अहमदाबाद , महेसाणा , पालनपूर , अबू रोड , फलना , मारवाड , पाली मारवाड , लुनी , जोधपूर , गोतान , मेरता रोड , नागौर आणि नोखा मार्गे बिकानेर येथे सोमवारी दुपारी 13.50 वाजता पोहोचतील.


गाडी क्रमांक 07054 बिकानेर – काचेगुडा हि विशेष गाडी बिकानेर येथून दिनांक 09 मे ते 27 जून दरम्यान दर मंगळवारी रात्री 20.15 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गाने काचीगुडा येथे गुरुवारी सकाळी 09.40 वाजता पोहोचेल. या गाड्यांमध्ये फर्स्ट एसी , 2 एसी , 3 एसी , स्लीपर आणि जनरल सेकंड क्लास कोच आहेत.

