
नवीन नांदेड। मानव केंद्रस्थानी ठेऊन, मानव शांतीसाठी, मानव कल्याणा करिता आयुष्य पणाला लावणारा विज्ञान, प्रेम, मैत्री, स्वातंत्र, समता, बंधुता, न्याय यांचे अभुतपूर्व संगम असलेल्या आणि जगाला हिंसेपासून रोखणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती सिडको येथील दिक्षा बौद्ध विहार एन डी ४१. राहुल नगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संविधान हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष भी.ना गायकवाड हे होते तर सिडको ब्लॉक काँग्रेस उपाध्यक्ष देविदास पाटील कदम, किशनराव रावणगावकर,विद्यार्थी नेते अक्षय कांबळे, वैजनाथ माने, पांडुरंग नगारे, यांची उपस्थिती होती.


कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व तद्नंतर त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणुन अध्यक्षीय समारोप करताना भि. ना गायकवाड यांनी उपस्थिताना भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवन चरित्रावर विस्तृतपणे अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले. विद्यार्थी नेते अक्षय कांबळे यांच्या वतीने कालवश सुधाकर कांबळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ बुद्ध जयंतीचे औचित्य साधून खीर दान वाटप केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक शशिकांत हाटकर यांनी केले.


यावेळी प्रल्हाद जोगदंड, नामदेव पदमने, सुभाष थोरात, जळबाजी हाटकर, सौ. मनिषा हाटकर,सौ नगारे ताई,सौ. गोडबोले ताई, श्रीमती सखुबाई सावळे,सौ सविता गणेश खंदारे, सौ. शिला बबन हाटकर,सौ गंगाबाई भिसे, यांच्यासह वार्डातील असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.
