नांदेड। तालुक्यातील जेष्ठ भारतीय जनता पार्टीचे नेते तथा कार्यकर्ते उमाकांतराव गोपछडे यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे राजकीय क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
बिलोली तालुक्यातील अत्यंत भाजप प्रेमी तथा कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सातत्याने सहभागी होणारे मनमिळाऊ आणि भारतीय जनता पार्टीची तालुक्यासह जिल्ह्याची विश्वासाने धुरा सांभाळणारे नेते म्हणून उमाकांतराव गोपछडे ओळखले जातात. ज्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यापासून ते जिल्हा चिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, बिलोली पंचायत समितीचे उपसभापती अशी अनेक पदे भूषवली आहेत.
त्यांची पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस व जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर , राज्य उपाध्यक्ष डॉ अजित गोपछडे,आमदार राम पाटील रातोळीकर,संघटन मंत्री संजय भाऊ कौडगे यांच्यासह राज्यांच्यां वरिष्ठ नेतृत्वानी योग्य ती दखल घेऊन प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य म्हणून निवड केल्याचे प्रसिद्धी केल्याची बातमी मिळताच बिलोली तालुक्यातील सच्चा एका सामान्य काम करणाऱ्या कार्यकर्त्याची दखल पक्षाने घेतल्याचे सर्वसामान्यातून बोलले जाते. त्यांच्या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
त्यांच्या निवडीचे भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, माजी जि. प. सदस्य बालाजी बच्चेवार, माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे, माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार, जि. प.सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड. तालुकाध्यक्ष श्रीनिवास नरवाडे, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पाटील चिंचाळकर, युवा मोर्चा बीलोली तालुका अध्यक्ष इंद्रजीत तूडमे, साईनाथ शिरोळे, चंद्रशेखर पाटील सावळीकर, विश्वनाथ समन,शंकर काळे,शिवकुमार देवाडे,शिवराज पाटील माळेगावकर, व्यंकटराव पाटील नरवाडे, राजू पाटील सावळीकर,माजी नगरसेवक यशवंत गादगे ,आबराव संगनोड, राजू गादगे ,दिलीप उत्तरवार ,शांतेश्वर पाटील लघुळकर, नागनाथ पाटील माचनूरकर, विजय होपळे.किशनराव आंबेराव, बालाजी नावाडे,आनंदराव गोपछडे, मुकूंद उपासे,सयद रियाज, शिवलिंग पिटलेवाड आदीसह अनेक कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.