Friday, June 9, 2023
Home धार्मिक नृसिंह जयंती निमित्ताने आयोजित अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण शिवमहापुराण कथा सोहळ्याची सांगता

नृसिंह जयंती निमित्ताने आयोजित अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण शिवमहापुराण कथा सोहळ्याची सांगता

by nandednewslive
0 comment

नवीन नांदेड। श्री नृसिंह जयंती निमित्ताने नरोबा देवस्थान मंदिर कौठा येथे २८ एप्रिल ते ४ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व शिव पुराण कथा सोहळ्याची हभप श्री चंद्रकांत महाराज लाठकर यांच्या काल्याचा किरतन दि. ५ एपिल रोजी झाली. यावेळी आयोजक नरोबा देवस्थान समितीचे अध्यक्ष गंगा प्रसाद काकडे यांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या महाप्रसाद लाभ भाविक भक्तांनी घेतला.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नृसिंह जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण शिवमहापुराण कथा व नृसिंह जयंती आयोजित करण्यात आली असून, कथा प्रवक्ता हभप बालाजी महाराज गुडेवार यांच्या समधुर वाणीतून दररोज १ ते ४ दरम्यान आयोजित करण्यात आला होता, सप्ताह मध्ये दैनंदिन काकडा, अभिषेक, गाथा भजन, ज्ञानेश्वर पारायण व शिव महापुरायण कथा दि. २८ एप्रिल ४ मे दरम्यान आयोजित करण्यात आला होता.

यात ह.भ.प.श्री. वासुदेव महाराज कोलंबीकर , ह.भ.प. शरदचंद्र महाराज देगलुरकर ,हभप काशिनाथ महाराज माने,ह.भ.प. योगेश महाराज अग्रवाल, ह.भ.प. बालाजी महाराज गुडेवार , ह.भ.प.श्री.विश्वनाथ महाराज काकांडीकर यांच्ये कीर्तन झाले. तर ४ मे रोजी श्री नृसिंह जयंती निमित्ताने गुरुवार दि. ०४ मे २३ रोजी महाअभिषेक सकाळी वाजता श्रींची मिरवणुक सायंकाळी ५ वाजता तर जन्मोत्सव व महाआरती संपन्न झाली, ५ मे रोजी काल्याचे किर्तन सकाळी १० ते १२ ह.भ.प.श्री. चंद्रकांत महाराज लाठकर याचे संपन्न झाले, यानंतर महाप्रसाद भंडारा उपस्थितीत भाविक भक्तांनी घेतला, हा अखंड सप्ताह यशस्वी करण्यासाठी मंदिर पुजारी गुरू व्यंकटेश मुळी व अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते निळकंठ काळे, बालाजी देऊळगावकर, नागनाथ बोडके,देविदास डुबुकवाड, आरटवाड,झोळगे काका, आयोजक श्री नृसिंह नरोबा मंदिर, बसवेश्वरनगर, जुना कौठा, नांदेड व सर्व भक्त व गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!