
नवीन नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या अध्यक्षपदी गोविंदराव हंबर्डे यांच्यी निवड निवडणुक अधिकारी कार्लेकर यांनी दि. ३ मे रोजी एका झालेल्या बैठकीत बिनविरोध निवड केली असून सचिव पदी संजय सिंह ठाकुर, कोषाध्यक्ष अभय जोशी, उपाध्यक्ष काळबा हणवंते यांच्यी निवड करण्यात आली आहे.


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पतसंस्थेच्यी ९ एप्रिल रोजी पंचवार्षिक निवडणुक झाली, या झालेल्या निवडणुकीत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक तथा संस्थापक शिवराम लुटे प्रणित कर्मचारी विकास पनलने ११ पैकी ११ उमेदवार बहुमताने निवडून आले, यात शिवराम लुटे, संजय सिंह ठाकुर,गोविंदराव हंबर्डे, हुशार सिंग साबळे, डॉ. संतोष खामीतकर, अभय जोशी, तुकाराम हंबर्डे, काळबा हणवंते,बालाजी शिंदे, हेमलता पाटील, ज्योती चितारे, हे विजयी झाले.


नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठया असलेल्या या पतसंस्थेवर स्थापना पासून शिवराम लुटे गटाचे वर्चस्व कायम असुन सध्या २२ वर्ष या संस्थेचे चालू आहे, स्वभांडलावर या पतसंस्थेने सभासदांना दहा लाख रुपये कर्ज, १२ टक्के लाभांश सभासदांना वाटप केले असून सतत स्थापना पासून अ वर्ग दर्जा कायम ठेवला आहे.


दि. ३ मे रोजी निवडणुक अधिकारी कार्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चेअरमन पदासाठी झालेल्या निवडणुकीत बिनविरोध गोविंदराव हंबर्डे यांच्यी , तर सचिवपदी संजय सिंह ठाकुर,उपाध्यक्ष काळबा हणवंते कोषाध्यक्ष अभय जोशी यांच्यी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडी नंतर बिनविरोध निवड झालेल्या पदाधिकारी यांच्ये अभिनंदन जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांच्या सह सर्व सभासदांनी केले.
